Home /News /national /

Explained : 22 वर्षांच्या दिशा रवीला अटक करण्याची नेमकी कारणं काय? काय आहेत आरोप?

Explained : 22 वर्षांच्या दिशा रवीला अटक करण्याची नेमकी कारणं काय? काय आहेत आरोप?

Disha Ravi

Disha Ravi

दिशा रवीला (Disha Ravi) टूलकिट शेअर केल्याप्रकरणी अटक केल्याचं सांगितलं जात आहे. काय आहे हा गुन्हा? कोणत्या कलमाखाली केली अटक?

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी :  हवामान बदल रोखण्याचा पुरस्कार करणारी स्वीडन येथील ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) हिच्याशी संबंधित 22 वर्षीय कार्यकर्ती दिशा रवी (Disha Ravi) हिला भारतीय पोलिसांनी नुकतीच अटक केली असून तिच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी दिशाने ऑनलाईन डॉक्युमेंट्स (Online Documents) तयार करुन शेअर केल्याचे पोलिसांनी सांगितले. दिशा रवीला रविवारी दक्षिण बेंगळुरु येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर तिला दिल्लीला आणण्यात आले. ती सध्या पोलिस कोठडीत आहे. तिच्या अटकेमुळे विरोधीपक्षांतील नेते, राजकारणी आणि कार्यकर्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकारशी मतभेद असलेल्यांना अशा पध्दतीने गप्प केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दिशा रवीवर कोणते आरोप आहेत? गेल्या महिन्यात राजधानीत झालेल्या हिंसाचाराला चालना देण्यासाठी टाईम बाऊंड ॲक्शन प्लॅन तयार करुन त्यासंदर्भात ऑनलाईन कागदपत्रे तयार करत ती शेअर करण्याचा आरोप दिशा रवीवर ठेवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी हजारो शेतकरी गतवर्षाच्या अखेरीपासून दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून आहेत. 26 जानेवारीला निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या एका गटाने शहराच्या मध्यवर्ती भागात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची पोलिसांशी जोरदार चकमक झाली तसेच यावेळी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरही ताबा मिळवण्यात आला. दिशा रवीने यासाठी तयार केलेल्या आणि थनबर्ग हिच्यासोबत शेअर केलेल्या टूलकिट (Toolkit) या ऑनलाईन दस्तावेजात अशा प्रकारची कृती करण्याची योजना आखण्यात आल्याचे वर्णन सापडले असा आरोप पोलिसांनी केला आहे. थनबर्ग हिने या कागदपत्रांची ऑनलाईन लिंक व्टिट करुन ती नंतर डिलिट केली. त्यानंतर तिने सोमवारी दिशा रविच्या अटकेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. टूलकिट म्हणजे काय? दिल्ली पोलिसांनी सोमवारी सांगितले, की टूलकिट या कागदपत्रांमध्ये सोशल मीडीया मोहिमेचा, जानेवारीत करण्यात येणाऱ्या कारवाईचा तपशील असून, निदर्शने करणाऱ्यांना राजधानीत प्रवेश करण्याबाबतच्या सूचनांचा तपशील होता. सरकारविरोधात चुकीची माहिती पसरवणे आणि अस्वस्थता निर्माण करणे, हा या टूलकिटचा मुख्य उद्देश होता, असे दिल्ली पोलिस अधिकारी प्रेमनाथ यांनी पत्रकारांना सांगितले. टूलकिटने कृत्रिमरित्या व्टिट बँकेच्या रुपात तयार केलेल्या बनावट बातम्या विविध व्टिटसव्दारे पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितलं.

4 फेब्रुवारीला दिल्ली पोलिसांनी सांगितले, की या दस्तावेजांच्या लेखकांवर देशद्रोह, हिंसाचार वाढवण्याच्या हेतूने चिथावणी देणे आणि विविध गटांमधील वैरभाव वाढवणे आदि आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा -  महिला पत्रकाराला मोठा दिलासा; एमजे अकबर यांचा मानहानीचा खटला कोर्टाने फेटाळला

रॉयटर्सने पुनरावलोकन केलेल्या दस्तावेजांच्या संग्रहित आवृत्तीत असे दिसून येते की प्रामुख्याने शेतकरी आंदोलनाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जागरुकता निर्माण करण्याकरिता यात सहभागी होण्यासाठी आणि निषेध कोणत्या पध्दतीने नोंदवावा यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे या टूलकिटमध्ये आहेत. याशिवाय सहभागींवर कोणते आरोप आहेत? या कागदपत्रांचे अनेक स्क्रिनशॉट्स तपासले असून, पश्चिम मुंबईतील वकील निकिता जेकब (Nikita Jacob) यांच्या घराची झडती घेण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीच्या तपासात रवी, जेकब आणि त्यांचा साथीदार शंतनू याने ही कागदपत्रे तयार केली आहेत. हे तिघेही खलिस्तान या स्वतंत्र शीखभूमी चळवळीतील समर्थकांच्या संपर्कात असल्याचे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी तयार केलेल्या दस्तावेजांमध्ये दुफळी निर्माण करणाऱ्या, खलिस्तानला समर्थन देणाऱ्या मजकूराचा समावेश आहे. जेकब यांच्या वकिलांनी मुंबई न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्यात त्यांनी म्हटलं आहे, की आमची क्लायंट आंदोलनात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसह शांततेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करीत होती. हिंसा भडकवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता.
Published by:news18 desk
First published:

Tags: Delhi, Delhi Police, Farmer protest

पुढील बातम्या