20 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली मुलगी सापडली गर्लफ्रेंडच्या घरी! पोलिसांनी केली पालकांकडे रवानगी

20 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली मुलगी सापडली गर्लफ्रेंडच्या घरी! पोलिसांनी केली पालकांकडे रवानगी

केरळच्या कोझीकोडमधील तरुणी आपल्या कुटुंबातून पळून आपल्या स्री पार्टनरकडे राहायला आली होती. 22 वर्षीय तरुणीच्या कुटुंबीयांनी तिच्या दुसऱ्या मुलीबरोबरच्या नात्याला विरोध केल्यानंतर तिने चेन्नईमधील आपल्या पार्टनरकडे पळ काढला होता.

  • Share this:

तिरूवनंतपुरम, 28 ऑक्टोबर : केरळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. चेन्नईमधून पोलिसांनी केरळमधील एका तरुणीला ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या 22 वर्षीय तरुणीला पोलिसांनी तिच्या गर्लफ्रेंडच्या, तिच्या स्त्री पार्टनरच्या घरातून जबरदस्ती ताब्यात घेतलं आहे.

केरळच्या कोझीकोडमधील तरुणी आपल्या कुटुंबातून पळून आपल्या स्री पार्टनरकडे राहायला आली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी रात्री केरळमधील पोलीस, महिला पोलीस आणि चेन्नई पोलिसांनी घरी जात या तरुणीला ताब्यात घेतलं. 22 वर्षीय तरुणीच्या कुटुंबीयांनी तिच्या दुसऱ्या मुलीबरोबरच्या नात्याला विरोध केल्यानंतर तिने चेन्नईमधील आपल्या पार्टनरकडे पळ काढला होता.

द न्यूज मिनिटच्या रिपोर्टनुसार, कुटुंबियांनी त्यांच्या नात्याला विरोध केल्यानंतर तिने चेन्नईमधील आपल्या पार्टनरच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला होता. गेले 20 दिवस ही तरुणी आपल्या पार्टनरसह या ठिकाणी राहत होती. ऑक्टोबरच्या सुरुवातीला तिच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर केरळ पोलिसांनी हजारो मैलांचा प्रवास करत तिला चेन्नईमधून ताब्यात घेत केरळमधील कोर्टात हजर केलं.

कधी पिवळ्या रंगाचं कासव पाहिलंय का? हे PHOTO पाहून विश्वास बसणार नाही

TNM मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी या तरुणीला आणि तिच्या पार्टनरला कोर्टात हजर करण्यापूर्वी कायदेशीर पद्धतीने बाजू मांडण्यासाठी वकीलदेखील दिला नाही. त्याचबरोबर ही 22 वर्षीय तरुणी सज्ञान असून ती तिच्या जबाबदारीवर आपल्या पार्टनरकडे चेन्नईमध्ये राहायला आली होती. तिला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आलं असता, चेन्नईला जाण्याआधी 10 दिवस आपल्या आई वडिलांबरोबर केरळमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निर्दयीपणाचा कळस! मतिमंद तरुणाला आधी दोरीनं बांधलं आणि मग खेचत नेलं; VIDEO VIRAL

सध्या LGBTQIA समाजाला सरकारने विविध सूट दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक अधिकारदेखील दिले आहेत. पण अनेक ठिकाणी यांना विरोध होताना दिसून येत आहे. 22 वर्षीय ही तरुणी सज्ञान असून, ती स्वतःहून आपल्या पार्टनरकडे राहायला गेली होती. पण पोलिसांनी केवळ आईवडिलांच्या तक्रारीवरून जबरदस्ती तिला ताब्यात घेतलं होतं.

OMG! शरीरावर तब्बल 6,37,000 मधमाश्या; VIDEO पाहूनच अंगावर येईल काटा

दरम्यान, LGBTQIA समाजाला अजूनही स्वीकारलं जात नसून घरच्यांचादेखील त्यांना पाठिंबा मिळत नाही. त्याचबरोबर डॉक्टर, मानसशास्रज्ञ आणि सामाजिक भान राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांकडून देखील त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. समलिंगी (होमोसेक्शुअल) आणि लेसबियन लोकांचा समाज लवकर स्वीकार करत नाही. त्याचबरोबर समलिंगी महिलांना या संकटाला तोंड दयावं लागतं. घरच्यांनी स्वीकार केला नाही तर त्या पळून जाण्यासारखी पावले उचलतात किंवा आत्महत्याही करतात.

2018 मध्येदेखील केरळ हायकोर्टाने अशाच एका केसमध्ये महिलेच्या बाजूने निकाल दिला होता. परंतु अशा केस कमी होताना दिसून येत नाहीत.

Published by: Karishma Bhurke
First published: October 28, 2020, 3:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या