ढाकामध्ये 22 मजली इमारतीत अग्नितांडव, 5 जणांचा मृत्यू

ढाकामध्ये 22 मजली इमारतीत अग्नितांडव, 5 जणांचा मृत्यू

भीषण अग्नितांडवात 60 जण जखमी झाले आहेत.

  • Share this:

ढाका, 28 मार्च : बांगलादेशची राजधानी ढाका येथील उच्चभ्रू परिसरातील एका उंच इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहेत. नौदल आणि वायुदलाचे जवानदेखील मदतकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीनंही इमारतीवर पाणी फवारण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बनानी परिसरातील 22 मजली एफआर टॉवरला भीषण आग लागली आहे. आगीच्या विळख्यामुळे अनेक जण इमारतीत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर काही जणांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून खाली उड्यादेखील मारल्या आहेत.

CNNनं दिलेल्या वृत्तानुसार, एफआर टॉवरला लागलेल्या भीषण आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत.

इमारतीला आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरभैर धावू लागले. यादरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून परिसर रिकामा करण्यात आला. बनानी परिसरात अनेक कार्यालय आहेत. आगीनं इतकं रौद्ररूप धारण केलं आहे की, आसपासच्या इमारतींमध्येही आग पसरण्याची भीती आहे.

VIDEO: तुमचं नागपूरचं बंडल तिथंच ठेवा - सुप्रिया सुळे

First published: March 28, 2019, 7:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading