• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मोठी दुर्घटना! नदीमध्ये बोट उलटल्यानं 22 प्रवासी बुडाले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

मोठी दुर्घटना! नदीमध्ये बोट उलटल्यानं 22 प्रवासी बुडाले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

मोतिहारीच्या शिकारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोढियातील सिकारहाना नदीत बोट उलटली. यामुळे बोटीतील 22 लोक नदीत बुडाले (22 People Missing After Boat Capsizes in River) .

 • Share this:
  पाटणा 26 सप्टेंबर : बिहारच्या पूर्व चंपारणमध्ये रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली (Bihar Boat Accident) . मोतिहारीच्या शिकारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोढियातील सिकारहाना नदीत बोट उलटली. यामुळे बोटीतील 22 लोक नदीत बुडाले (22 People Missing After Boat Capsizes in River) . बोट उलटल्याची बातमी पसरताच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. पोलीस-प्रशासनालाही कळवण्यात आलं. तोपर्यंत गावकऱ्यांनी नदीत बुडालेल्या लोकांचा शोध सुरू केला. आतापर्यंत नदीमधून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, तर पाच जणांना पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. अमित शहांनी बोलावली बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीच्या दिशेनं रवाना नदीत बोट पलटल्याचं वृत्त समजताच गावातील शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून मदत पोहोचण्याआधीच या लोकांनी आपल्या पातळीवर नदीत बुडालेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलं. ज्या लोकांना पोहायला येत होतं त्यांनी नदीत उड्या घेत बुडालेल्या लोकांचा शोध घेण्याचं काम सुरू केलं. समोर आलेल्या माहितीनुसार, नदीतून एका लहान मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर, पाच इतर लोकांनाही गावकऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोमवारी संयुक्त किसान मोर्चाकडून 'भारत बंद'ची घोषणा; या सेवांवर होणार परिणाम पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्याच्या शिकारगंज ठाण्याच्या गोढिया गावात घडलेल्या या दुर्घटनेचा तपास सुरू केला गेला आहे. प्रशासन होडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांनी बसवल्याच्या आणि इतर अंगांनी या घटनेचा तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात होडीनं नदी पार करणं सामान्य गोष्ट आहे. याचमुळे आजही हे लोक सिरकहना नदी पार करत होते. याच दरम्यान ही दुर्घटना घडली.
  Published by:Kiran Pharate
  First published: