Corona Cases Live Update: मागील 24 तासांत देशात 2,16,850 नव्या रुग्णांची नोंद; महाराष्ट्राची स्थिती बिकट

Corona Cases Live Update: मागील 24 तासांत देशात 2,16,850 नव्या रुग्णांची नोंद; महाराष्ट्राची स्थिती बिकट

Corona Cases Maharashtra : महाराष्ट्रात मागील चोवीस तासांत 61 हजार 695 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान काल 2 लाख 34 हजार 452 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 एप्रिल: कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन देशासाठी अत्यंत घातक ठरत आहे. अशातच देशात कोरोना रुग्णांच्या (Corona Cases in India) संख्येमध्ये दररोज नवे उच्चांक नोंदले जात आहे. मागील चोवीस तासांत देशात  कोरोना (Corona Update) रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 2 लाख 16 हजार 850 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे. असं असतानादेखील विविध राज्यात निवडणुकीची धामधुम जोरात सुरू आहे. तसेच हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 42 लाख 87 हजार 740 वर पोहोचली आहे. तर मागील अवघ्या 24 तासांत देशात 2 लाख 16 हजार 850 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर 1183 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अलीकडेच भारताने सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकलं आहे. त्याचबरोबर देशात रुग्णवाढीचा दर लक्षात घेता, भारत लवकरच अमेरिकेलाही मागे टाकू शकतो.

महाराष्ट्रात कोरोना स्थिती बिकट

महाराष्ट्रात मागील चोवीस तासांत 61 हजार 695 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान काल 2 लाख 34 हजार 452 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दुसरीकडे 53 हजार 335 रुग्ण कोरोना मुक्त झाली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 29 लाख 59 हजार 056 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात सध्या 6 लाख 20 हजार 060 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. त्याचबरोबर राज्यात कोरोना रिकव्हरी रेटमध्येही घसरण झाली असून राज्यात सध्या 81.3 एवढा रिकव्हरी रेट आहे.

हे ही वाचा-मृतदेहाला अग्नी देण्यासाठी लांबच्या लांब रांगा;5 ते 6 तास करावी लागतेय प्रतीक्षा

काल दिवसभरात मुंबईतही कोरोनाचा कहर पाहायला मिळाला आहे. गुरुवारी मुंबईत 8,209 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. या आकडेवारीसह, मुंबईत आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 53 हजार, 404 वर पोहोचली आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत मुंबईत 50 कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. मुंबईत कोरोना मृतांची संख्या 12,197 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूची वाढती संख्या महाराष्ट्रासाठी डोकेदुखी ठरत आहे. याचा प्रचंड ताण आरोग्य प्रशासनावर पडत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होतं आहे.

Published by: News18 Desk
First published: April 16, 2021, 8:57 AM IST

ताज्या बातम्या