21 वर्षांच्या तरुणीचा नवा विक्रम; निवडणुकीत सलग दोनवेळा बिनविरोध जिंकून मिळवलं यश

21 वर्षांच्या तरुणीचा नवा विक्रम; निवडणुकीत सलग दोनवेळा बिनविरोध जिंकून मिळवलं यश

विशेष म्हणजे या तरुणीच्या वडिलांनी तिला निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे

  • Share this:

बाडमेर, 27 नोव्हेंबर : निवडणूक जिंकण्यासाठी नेत्यांनी काय काय करावे याची माहिती त्यांना असते. तरीही ते निवडणूक जिंकतीलच याची अनेकदा शाश्वती नसते. परंतु पश्चिम राजस्थानमधील (Rajasthan) भारत-पाकिस्तान सीमेवर (India-Pakistan Border) वसलेल्या बाडमेर जिल्ह्यात 21 वर्षीय युवतीने एक नवीन विक्रम केला आहे. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ती आठ महिन्यांत सलग दोनदा बिनविरोध निवडून आली आहे.

ही गोष्ट बाडमेरच्या धोरीमन्ना पंचायत समितीत घडली आहे. पंचायत समितीच्या सुदाबेरी गावात राहणारी सरिता बिश्नोई आठ महिन्यांपूर्वी तिच्या गावाची सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आली होती. आता जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे पंचायत समिती निवडणूक आली तेव्हा सरिताने धोरीमन्ना प्रधानपदाची निवडणूक लढवली. यासाठी तिने वॉर्ड 3 मधून पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आनंदाची गोष्ट म्हणजे सरिता या प्रभागातूनही पंचायत समितीवर बिनविरोध निवडली गेली.

हे ही वाचा-जवानांच्या पुढाकाराने नवजात बाळ-आई सुखरुप घरी; VIDEO पाहून तुम्हीही कराल सॅल्यूट

स्थानिक स्वराज्य संस्था कायदा 1994 च्या कलम 20 नुसार एका पदावर निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी दुसऱ्या पदावर निवडले गेल्यास पहिले पद त्यांना सोडावे लागते. अशा परिस्थितीत धोरीमन्ना गट विकास अधिकार्‍यांनी आदेश जारी करून सरिताला सुदाबेरी सरपंच पदावरून मुक्त केलं होतं.

वडिलांनी मुलीला उतरवलं निवडणुकीच्या रिंगणात

सुदाबेरीच्या जयकिशन यांना चार मुले आहेत. कायद्यानुसार दोनपेक्षा जास्त मुलं असलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नाहीत पण त्यांना त्यांच्या मुलांपैकी एकाला त्या निवडणुकीसाठी उभे करायचे होते. परंतु त्यांचे उर्वरित दोन मुलगे आणि एक मुलगी लहान आहे. अशा परिस्थितीत आपण निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा पंचायत समिती निवडणुकीत सरिता हिलाच उमेदवार म्हणून उभे केले.यावेळी गावातील लोकांनी तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आणि सरिता बिनविरोध निवडून आली आठ महिन्यांच्या कालावधीत सरिता दोन वेळा बिनविरोध निवडून आली आहे.

सुदाबेरी सरपंच हे पद आता तिला सोडावे लागणार...

धोरीमन्ना विकास अधिकारी नरेंद्र सोऊ यांनी पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस अगोदरच धोरीमन्ना पंचायत सदस्यांना आदेश जारी केला, असून सारिताला सुदाबेरी सरपंचपदावरून  मुक्त केले आहे. अशा परिस्थितीत सरिताकडे आता प्रभाग तीन मधील सदस्यपद असणार आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 27, 2020, 9:30 PM IST
Tags: election

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading