ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा

ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अमेरिकेच्या हॅकरचा दावा

'दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही ईव्हीएम घोळ होणार होता. पण आम्ही तो वेळीच रोखला. त्यामुळे तिथे भाजपचा पराभव झाला होता'

  • Share this:

21 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्ह आहे. अमेरिकेतील एका हॅकरने पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात, असा खळबळजनक दावा केला आहे. सय्यद शुजा असं या हॅकरचं नाव आहे.

सय्यद शुजाने लाईव्ह पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला आहे. त्याने यावेळी अनेक खळबळजनक दावे केलेआहे. 2014 ची लोकसभेची निवडणूक ही फिक्स होती, असा आरोपही त्याने केला. तसंच 'माझ्याकडे यासंदर्भात पुरावे आहे आणि मी ते दाखवू शकतो', असा दावाही त्याने केला.

तसंच 'दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही ईव्हीएम घोळ होणार होता. पण आम्ही तो वेळीच रोखला. त्यामुळे तिथे भाजपचा पराभव झाला होता. आपने 70 पैकी 67 जागा जिंकल्यात', असा दावाही त्याने केला.

ईव्हीम मशीन तयार करणाऱ्या टीममध्ये आपण होतो. त्यामुळे ही मशीन कशी हॅक करायची हे मला माहिती आहे. निवडणूक आयोगाने सांगितल्यास त्यांना दाखवू शकतो, असं आव्हानच त्याने दिलं.

काही दिवसांपूर्वीच शुजा आणि त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यामुळे त्याने आज लंडनमध्ये गुप्तपणे व्हिडिओ काॅन्फरर्सद्वारे पत्रकार परिषद घेतली. शुजा हा आधी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा कर्मचारी होता. त्याने 2009 ते 2014 च्या काळात काम केले.

परंतु, निवडणूक आयोगाने शुजाचा दावा खोडून काढला आहे. त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

============================

First published: January 21, 2019, 7:57 PM IST

ताज्या बातम्या