• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • या राज्यात शाळा उघडताच दोन शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव; 20 मुलं बाधित

या राज्यात शाळा उघडताच दोन शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव; 20 मुलं बाधित

पंजाबमध्ये (Punjab) शाळा सुरु केल्यानंतर काही दिवसांतच 20 मुलांना (20 students) कोरोनाची लागण (Corona infection) झाल्यामुळे शाळा सुरु करण्याच्या तयारीत असणाऱ्या महाराष्ट्राची (Maharashtra school decision) चिंता वाढली आहे.

 • Share this:
  चंदिगड, 10 ऑगस्ट : पंजाबमध्ये (Punjab) शाळा सुरु केल्यानंतर काही दिवसांतच 20  मुलांना (20 students) कोरोनाची लागण (Corona infection) झाल्यामुळे शाळा सुरु करण्याच्या तयारीत असणाऱ्या महाराष्ट्राची (Maharashtra school decision) चिंता वाढली आहे. पंजाबमध्ये दोन सरकारी शाळांमधील 20 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये 26 जुलैपासून दहावी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पंजाबच्या मुख्य सचिवांकडून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोन शाळांमधील विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. आता विद्यार्थ्यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लुधियानाच्या उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार लुधियानातील 2 शाळांमधील 20 विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या विद्यार्थ्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं असून त्यांच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात चिंता वाढली महाराष्ट्रात 17 तारखेपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबमध्ये शाळा सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यामुळे इतर राज्यांनाही आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये हळूहळू शाळा सुरू होत आहेत. मात्र पंजाबमधील या परिस्थितीचा महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या निर्णयावर काही परिणाम होतो का, हे पाहणंदेखील महत्त्वाचं असणार आहे. हे वाचा -आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यात निधन, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास पंजाबमध्ये वाढतेय कोरोनाची आकडेवारी पंजाबमध्ये आढळणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याचं चित्र आहे. सोमवारी नोंदवल्या गेलेल्या आकडेवारीनंतर कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 5,99,514 झाली आहे. तर कोरोना बळींची संख्या 16,320 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 441 झाली असून गेल्या 24 तासात 43 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
  Published by:desk news
  First published: