मराठी बातम्या /बातम्या /देश /

गुगलवरुन बँक हेल्पलाईन नंबर घेणे महागात, माजी सैनिकाच्या खात्यातून तब्बल 20 लाख रुपये लंपास

गुगलवरुन बँक हेल्पलाईन नंबर घेणे महागात, माजी सैनिकाच्या खात्यातून तब्बल 20 लाख रुपये लंपास

हा माजी सैनिक नागयार पंचायतीच्या मरुडा गावात राहतो. त्यांचे नाव दिवाण चंद असे आहे. ते यावर्षी 31 जानेवारी रोजी भारतीय नौदलातून निवृत्त झाले.

  • Published by:  News18 Desk

बिलासपूर, 13 जुलै : हिमाचलमध्ये एका माजी सैनिकाला धक्कादायक अनुभव आला आहे. नेट बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी गुगलवरून बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकाची मदत घेणे या माजी सैनिकाला महागात पडले. सायबर क्राईम आरोपींनी माजी सैनिकाच्या खात्यातून तब्बल 20 लाख रुपये काढून घेतले. ही धक्कादायक घटना हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथील आहे. याप्रकरणी बिलासपूरच्या तलाई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा माजी सैनिक नागयार पंचायतीच्या मरुडा गावात राहतो. त्यांचे नाव दिवाण चंद असे आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, ते यावर्षी 31 जानेवारी रोजी भारतीय नौदलातून निवृत्त झाले. हमीरपूर जिल्ह्यातील पीएनबीच्या हरसौर शाखेत त्यांचे बँक खाते आहे. पेन्शनची माहिती घेण्यासाठी त्यांनी बँकेत जाऊन नेट बँकिंग सुविधा सुरू करण्याची विनंती बँक व्यवस्थापकाला केली होती. बँक मॅनेजरने सांगितले की, ते स्वतःही ऑनलाईन नेट बँकिंग सुरू करू शकतात.

दिवाण चंद यांच्या म्हणण्यानुसार, बँक मॅनेजरच्या सांगण्यावरून त्यांनी गुगलवर बँकेचा हेल्पलाइन नंबर शोधला. यादरम्यान त्यांनी फोनवर नेट बँकिंग सुरू करण्यास सांगितले. ऑनलाईन नोंदणीसाठी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, नोंदणी होऊ शकली नाही. त्यानंतर हेल्पलाईन क्रमांकावर बोलत असलेल्या आरोपीने ओटीपी क्रमांक घेतला आणि यानंतर थेट बँक खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज आला.

हेही वाचा - दुकानातून परतत असताना सेल्स गर्लसोबत धक्कादायक कृत्य, मळ्यात नेऊन सामूहिक बलात्कार

खात्यात होते तब्बल इतके पैसे आणि उरले नंतर...

त्यांच्या बँक खात्यात तब्बल 40,99,210 इतके रुपये होते. यानंतर ते 26,00,209 इतके उरले. यानंतर आणखी 5 लाख रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यातून कापले गेले. यानंतर त्यांच्या खात्यात 21,00,209 इतकी रक्कम राहिली. याप्रकरणी बिलासपूरच्या तलाई पोलीस ठाण्यात IPC आणि IT अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Google, Himachal pradesh, Online fraud, Pnb bank