नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) 20 दिवसांचा जंगी सोहळा (20 days mega event) रंगणार आहे. गुरुवारपासून याची सुरुवात होणार असून पंतप्रधानांचा 71 वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला जाणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील भारतमाता मंदिरात 71 हजार दिवे लावले जाणार आहेत.
भाजपकडून जोरदार तयारी
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून 14 कोटी रेशन बॅगचं वाटप केलं जाणार आहे. या प्रत्येक बॅगेवर ‘थँक यू मोदीजी’ असा संदेशही छापण्यात आला आहे. त्याचप्रमाणं भारतीय पोस्ट खात्यातून 5 कोटी पोस्टकार्ड्स वेगवेगळ्या पत्त्यांवर पाठवले जाणार आहेत. भाजपनं मोदींचा यंदाचा वाढदिवस जंगी करण्याचं नियोजन केलं असून देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहिम, धान्याचं वाटप यासारख्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
20 दिवसांचे अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 20 दिवसांचे ‘सेवा आणि संपर्क अभियान’ चालवलं जाणार आहे. या अभियानाची सुरुवात गुरुवारपासून होणार आहे. एकट्या उत्तर प्रदेशात या अभियानासाठी तब्बल 27 हजार बुथ उभारण्यात आले असून आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचा प्रचारासाठीदेखील वापर करून घेण्यात येणार आहे.
हे वाचा - Corona Alert : लसीची परिणामकारकता हळूहळू होते कमी, अनेक देशांत तिसरा डोस सुरू
मोदींची प्रसिद्ध वक्तव्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांसाठी आणि लोकप्रिय वक्तव्यांसाठी ओळखले जातात. गणित ही काही केवळ समीकरणे सोडवण्याची पद्धत नसून ती विचार करण्याची पद्धत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तर कुठल्याही विद्यार्थ्यांची इतर विद्यार्थ्यांसोबत तुलना न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता. त्यांनी अशी अनेक विधाने लोकप्रिय आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.