खरी जिद्द! कोरोना पॉझिटिव्ह असून नर्सनं दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक

खरी जिद्द! कोरोना पॉझिटिव्ह असून नर्सनं दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नर्सनं हॉस्पिटलचं केलं परीक्षाकेंद्र, वाचून तुम्हीही कराल सलाम.

  • Share this:

पटियाला, 23 जून : देशात कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख पार झाला आहे. दिवसेंदिवस नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना वॉरियर्स बनून लोकांची सेवा करणाऱ्या नर्स आणि डॉक्टर यांनाही कोरोनानं शिकार केलं आहे. मात्र पंजाबमध्ये 2 नर्सनं एक आदर्श काम केलं आहे.

पंजाबच्या पटियाला येथल राजींद्र रुग्णालयात या दोन्ही नर्स कोरोनावर उपचार घेत आहे. या दोघी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. मात्र या सगळ्याचा परिणाम त्यांनी आपल्या अभ्यासावर होऊ दिला नाही. नर्स पदासाठी सरकारी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला बसण्याची विनंती दोन्ही नर्सने सरकारकडे केली होती. त्यानुसार त्यांना आयसोलेशनमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवत परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली.

वाचा-कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषध कोरोनिल तयार, पतंजली आज जगासमोर आणणार

वाचा-बापरे! मच्छिमारांच्या जाळ्यात सापडले चीनी चहाचे डब्बे, निघाली 230 कोटींची वस्तू

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या दोघांचाही पोस्ट करत, या मुलींचे कौतुक केले आहे. दुसरीकडे पंजाबमध्येही कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. राज्यात 4075 कोरोनाबाधित रुग्ण असून 99 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2700 निरोगी झाले आहेत. दरम्यान अमरिंदर सिंग यांनी 30 जूननंतर लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

वाचा-अमेरिकेनंतर कोरोनाचा जगातला नवा हॉटस्पॉट भारत नव्हे! या देशात एका दिवसात सापडले

संपादन-प्रियांका गावडे.

First published: June 23, 2020, 9:26 AM IST

ताज्या बातम्या