सूरत 23 मार्च : सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव' संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र वायनाडच्या खासदाराला 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर लगेच जामीन मिळाला. राहुल गांधी यांनी 'सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे?', असे कथित वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भारतातील या भागात 24 तास जनतेची सेवा करणार 'राष्ट्रपती', नेमकं काय आहे प्रकरण?
राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार तसंच गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती. वायनाडचे लोकसभा सदस्य असलेल्या गांधी यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत कथित टिप्पणी केली होती.
#WATCH | Gujarat: Congress MP Rahul Gandhi reaches Surat District Court
The court is likely to pass an order in a criminal defamation case against him over his alleged 'Modi surname' remark. pic.twitter.com/uCz56SP5nz — ANI (@ANI) March 23, 2023
राहुल गांधी यांचे वकील किरीट पानवाला यांनी सांगितलं की, मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि निकालाची तारीख 23 मार्च निश्चित केली. भारतीय दंड संहितेच्या कलम 499 आणि 500 (मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल गांधी ऑक्टोबर 2021 मध्ये सुरत कोर्टात त्यांचे म्हणणं नोंदवण्यासाठी हजर झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra Modi, Rahul gandhi