आता या '2' मार्गांनी मुस्लिम घेऊ शकतील 'तलाक'

आता या '2' मार्गांनी मुस्लिम घेऊ शकतील 'तलाक'

पण तलाक- ए-हसना आणि तलाक-ए-एहसन मात्र कायम ठेवलं आहे. या तलाकांच्या मार्गाने मुस्लिमांना तलाक घेता येणार आहेत.

  • Share this:

22 ऑगस्ट: सुप्रीम कोर्टाने आज इन्स्टंट तिहेरी तलाक रद्द केला आहे. पण अजून दोन प्रकारचे तिहेरी तलाक आहेत. हे दोन तलाक मात्र कायम राहणार आहे.

इन्स्टंट तिहेरी तलाकला तलाक-ए-बिद्दलला रद्द केलं आहे.यात तीनदा तलाक म्हटलं की लगेच तलाक मिळतो. पण तलाक- ए-हसना आणि तलाक-ए-एहसन मात्र कायम ठेवलं आहे. या तलाकांच्या मार्गाने मुस्लिमांना तलाक घेता येणार आहेत.

तलाक-ए-एहसन- या तलाक प्रकारामध्ये पतीने पत्नीला एकदा तलाक म्हटंल्यानंतर तीन महिने वाट पाहावी लागेल. जर तीन महिन्यांमध्ये पती पत्नीमध्ये समझोता झाला तर तलाक होत नाही. जर समझोता झाला नाही तर मात्र तीन महिन्यांनी तलाक कायम राहील.

तलाक -ए-हसना- या तलाक प्रकारात महिन्यातील महिलेच्या मासिक पाळीनंतर तलाक म्हटलं जातं. त्यानंतर पुढचे दोन महिने म्हणजे एकूण तीन महिने जर मासिक पाळीनंतर तलाक म्हटलं गेलं तर मग तलाक झाला असं मानलं जातं.

या दोन तलाकांनीही रद्द करावं असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मुस्लीम लॉ बोर्डाला मात्र इन्स्टंट तिहेरी तलाक हा एक तलाक काढला तरी चालणार होतं. तसा क्लॉज निकाहनाम्यात टाकायला ते तयार होते. त्यामुळे त्यांचीही एक मागणी मान्य झाली आहे.

पण आता मुस्लीम महिलांना घटस्फोटानंतर पोटगीचे अधिकार कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published: August 22, 2017, 1:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading