जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत महाराष्ट्रातील मिलिंद किशोर शहीद

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत महाराष्ट्रातील मिलिंद किशोर  शहीद

काल संध्याकाळपासून बंदीपुराच्या हाजीन गावात लष्कराचा पहारा होता. ३ ते ४ दहशतवादी गावात लपून बसल्याची माहिती त्यांना मिळाली होती. रात्री शोधकार्य आणखी तीव्र करण्यात आलं. मध्यरात्रीच्या आसपास दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला

  • Share this:

बंदीपुरा,11ऑक्टोबर: जम्मू आणि काश्मीरच्या बंदीपुरामध्ये चकमक सुरू भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यात २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय, पण दुर्दैवानं आपले २ जवान यात शहीद झाले आहेत.त्यात एक महाराष्ट्रातील मिलिंद  किशोर आहेत.

काल संध्याकाळपासून बंदीपुराच्या हाजीन गावात लष्कराचा पहारा होता. ३ ते ४ दहशतवादी गावात लपून बसल्याची माहिती त्यांना मिळाली होती. रात्री शोधकार्य आणखी तीव्र करण्यात आलं. मध्यरात्रीच्या आसपास दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. १३ राष्ट्रीय राफल्स, ९ पॅरा आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप मिळून ही कारवाई करत आहेत. शहीद झालेले जवान हे वायुदलाच्या गरुड पथकाचे सदस्य होते, अशी माहिती मिळतेय. ते प्रशिक्षणासाठी लष्कराच्या कारवाईत सहभागी झाले होते, असंही वृत्त आहे. अजूनही दोन तीन दहशतवादी गावात लपून बसले असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

First Published: Oct 11, 2017 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading