काश्मीरमध्ये भारतीय सेनेने केला दोन दहशतवाद्यांचा खातमा

काश्मीरमध्ये भारतीय सेनेने केला दोन दहशतवाद्यांचा खातमा

पुलवामाच्या ताहब विभागात आतंकवादी लपले असल्याची माहिती सेनेला सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर आतंकवाद्यांना सेनेनं चहू बाजूने घेरलं.

  • Share this:

 

काश्मीर,30जुलै: काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय सेना आणि दहशतवाद्यांमध्ये  झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार. दहशतवाद्यांच्या  हल्ल्यात सेनेचा एक जवानही जखमी झाला आहे.

पुलवामाच्या ताहब विभागात दहशतवादी  लपले असल्याची माहिती सेनेला सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर दहशतवाद्यांना सेनेनं चहू बाजूने घेरलं. दोन्ही बाजूंनी फायरिंग सुरू झाली. आणि अखेर दोन दहशतवाद्यांचं एन्काऊंटर करण्यात सेनेला यश आलं. अजूनही काही दहशतवादी या भागात लपले असल्याची शक्यता असल्यानं त्यांना शोधण्यासाठी सेनेचं सर्च ऑपरेशन चालू आहे.

जखमी जवानाला बेसवरच्या रुग्णालयात भरती केलं गेलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या दहशतवाद्यांकडून भारतीय सेनेनं एके 47 आणि काही शस्त्रंही जप्त केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2017 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...