जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत पाक जैश कमांडरसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा; ऑपरेशन सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत पाक जैश कमांडरसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा; ऑपरेशन सुरू

मृत झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी तर दुसरा स्थानिक दहशतवादी असल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

श्रीनगर, 24 डिसेंबर : जम्‍मू-कश्मीरमधील (Jammu kashmir) बारामुल्लामध्ये गुरुवारी सुरक्षादलांच्या चकमकीत जैश कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. मृत झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी तर दुसरा स्थानिक दहशतवादी असल्याचे समोर आले आहे.

गुरुवारी सुरक्षा दलांच्या चकमकीत जैश कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मृत झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी तर दुसरी स्थानिक आहे. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या भागात त्यांचे सोबती लपलेले असू शकता, ज्यानंतर ऑपरेशन अद्याप सुरू आहे. सातत्याने सुरक्षा दलांकडून सरेंडर करण्याची अपीलही केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुरक्षा दलांना सूचना मिळाली होती की, बारामूल्लाचे वानीगाम भागात जैश दहशतवादी एका घराच्या मागे लपले होते. या सूचनेवर कारवाई करीत पोलिसांनी सैन्याच्या टीमसोबत संपूर्ण भागाला घेराव घातला. सर्च ऑपरेशन सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांना सरेंडर करण्यास सांगण्यात आले. मात्र दहशतवाद्यांनी ऐकलं नाही आणि फायरिंग सुरू केली. यानंतर दोन्ही कडून चकमक सुरू झाली. ज्यामध्ये तब्बल 8 तास दोन दहशतवाद्यांना मारण्यात आलं. मारले गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश कमांडर अबरार उर्फ लांगू आणि एक स्थानिक दहशतवादी अमीर सिराज यांचा समावेश आहे. दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे.

कधीकाळी होता फुटबॉलचा खेळाडू..

सिराज यावर्षीच्या जुलै महिन्यात दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. तो फुटबॉलचे चांगला खेळाडू होता. मात्र दहशतवादात सामील झाला. पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अद्यापही ऑपरेशन सुरू आहे. सांगितलं जात आहे की, पाकिस्तानी कमांडर अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील होता. तो मोठ मोठे हल्ले करण्याचा प्लान करीत होता.

Published by: Meenal Gangurde
First published: December 24, 2020, 10:47 PM IST

ताज्या बातम्या