जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनात दोन जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनात दोन जवान शहीद

  • Share this:

07  एप्रिल : जम्मू काश्मीरच्या बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात भारताचे 2 जवान शहीद झाले आहेत. याच घटनेत एक जवान बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

लडाख इथल्या बटालिक सेक्टरमध्ये काल (गुरूवारी) जोरदार हिमवृष्टी झाली. याच दरम्यान हिमस्खलन झालं आणि बर्फाखाली भारतीय सैन्यातील 5 जवान गाडले गेले. यातील 2 जवनांची गुरूवारी ढिगाऱ्याखालुन सुटका करण्यात यश आलं होतं. शुक्रवारी सकाळी दोन जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर एक जवान अजूनही बेपत्ता आहे.

काश्मीर खोऱ्यात गुरूवारपासून बर्फवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत दोन नागरिकांचा या घटनेत मृत्यू झाला असून पूरग्रसत भागात मदतीसाठी सैन्याच्या पथकाला पाठवण्यात आलं आहे.

First published: April 7, 2017, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading