लखनऊ 24 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये एका सोन्याच्या व्यापाऱ्याच्या घरामध्ये मित्राच्या वाढदिवसाची पार्टी (Birth Day party) सुरू होती. यादरम्यान सोमवारी (23 ऑगस्ट 21) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घराचं छप्पर कोसळलं आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला (2 Killed as Building Collapses During Birthday Party ) तर 15 जणं जखमी झाले आहेत. पण बर्थ डे बॉय (Birthday Boy) अनिकेत चौधरी सुखरूप आहे. पडलेल्या राड्यारोड्यातून माणसांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती उत्तर प्रदेश (UP Police) पोलिसांनी दिली आहे. वाढदिवसासाठी लावलेल्या डीजेच्या (DJ songs) आवाजाच्या धक्क्याने किंवा त्या गाण्यांच्या तालावर नाचणाऱ्या लोकांच्या वजनामुळे हे छप्पर कोसळलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोन्याचा व्यापारी सोनू वर्मा याने हे 30 वर्षांपूर्वीचं घर विकत घेतलं होतं आणि त्याचं रिन्युएशन (Home Renovation work) करण्याचं काम सुरू होतं. झी न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सोनूचा मित्र अनिकेत चौधरी याच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या पार्टीत 50 जण सहभागी झाले होते. यावेळी डीजेवर प्रचंड मोठ्या आवाजात गाणी लावली होती. सगळे त्याच तालावर नाचण्यात मशगुल होते. त्याचवेळी अचानक दुसऱ्या मजल्यावरची फरशी खाली कोसळली म्हणजे पहिल्या मजल्याचं छत कोसळलं. हा जोर इतका होता की पहिल्या मजल्याच्या फरशीला तो सहन झाला नाही आणि ती पहिल्या मजल्यावरची फरशी तळमजल्यावरच्या जमिनीवर कोसळली.
सासऱ्यानं सुनेसह 5 जणांची केली निर्घृण हत्या; स्वतः पोलिसांकडे जात सांगितलं कारण
हा आवाज इतका जोरदार होता की परिसरातील लोक जमा झाले. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यावर ते लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केलं. लोकांचा अंदाज असा आहे की डीजेवर लावलेल्या संगीताची व्हायब्रेशन आणि त्यावर चाललेल्या नाचामुळे 30 वर्षांपूर्वीच्या या घराचे (30 years old house) छत कोसळले असावे.
नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; 'त्या' वक्तव्याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांमध्ये घराचा मालक सोनूचा शेजारी मनजित याचा सामावेश आहे. दुसऱ्या मृत व्यक्तीचं नाव अरूण आहे. या घटनेबाबत आग्र्याचे डीएम (DM Agra) पीएन सिंह म्हणाले, ‘ अनिकेत चौधरी नावाच्या मुलाच्या बर्थ डेची पार्टी सुरू होती. कमकुवत असलेलं गाटर पट्टी प्रकारचं छत एकदम कोसळलं. या घटनेत 15 जण जखमी झाले आहेत. त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं आहे. मदत कार्य सुरू आहे. ताजगंज पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने घटनास्थळी सर्वांत पहिल्यांदा पोहोचले. याबाबतची अधिक माहिती आम्ही देत राहू.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Uttar pradesh