मराठी बातम्या /बातम्या /देश /मशिदीचा खांब कोसळून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर

मशिदीचा खांब कोसळून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; एकाची प्रकृती गंभीर

Accident in Mosque: नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांवर काळाने घाला घातला आहे. नमाज पठण करत असताना अचानक मशिदीचा खांब कोसळून (mosque pillar collapses) दोन मुलांचा मृत्यू (2 deaths) झाला आहे.

शामली, 29 मार्च: नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांवर काळाने घाला घातला आहे. नमाज पठण करत असताना अचानक मशिदीचा खांब कोसळून (mosque pillar collapses) दोन मुलांचा मृत्यू (2 deaths) झाला आहे. यावेळी काही मुलं शब-ए-बारात निमित्त मशिदीत नमाज पठण करत होती. मशिदीतला खांब अचानक कोसळल्याने खांबाच्या ढिगाऱ्याखाली तीन मुलं अडकली गेली. यावेळी मशिदीत आजूबाजूच्या लोकांनी तातडीने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तत्पूर्वी दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक मुलगा गंभीर जखमी झाला.

संबंधित वेदनादायक अपघात हा उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील मोमीन नगर याठिकाणी घडला आहे. मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर तिसऱ्या एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या तिन्ही मुलांना शामलीच्या खासगी रुग्णालयातून मेरठच्या उच्च  रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ही तिन्ही मुलं शब-ए-बारात निमित्त मशिदीत नमाज अदा करत होती. दरम्यान मशिदीचा स्तंभ कोसळला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

श्रिया पिळगांवकरने बॉलीवूडमधील 'मानधनाच्या' मुद्द्यावर उठविला आवाज...

मोमीन नगर येथील मदीना मशिदीत शब-ए-बारात निमित्त अनेक लोकं नमाज पठण करण्यासाठी आले होते. यावेळी मशिदीत नमाज पठणासाठी स्थानिकांनी बरीच गर्दी केली होती. असं सांगितलं जात आहे की, नमाज पठण करत असताना अचानक मशिदीतील एक खांब कोसळला, त्यामध्ये तीन निष्पाप दबली गेली. मुलांची आरडाओरड ऐकून आजूबाजूच्या उपस्थित लोकांनी त्या तिघांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं आणि शामलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं, तिथे डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केलं.

पोलिसांचा तपास सुरू

दोन्ही मृत मुलं साधारणतः 12 वर्षांची आहेत. खुर्शीद आणि मतलूब अशी या दोन मृत मुलांची नावं आहेत. तर या अपघातात सापडलेल्या तिसऱ्या दहा वर्षीय मुलाचं नाव कलीम असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातामुळे कुटुंबात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा तपास सुरू केला आहे.

First published:

Tags: Accident, Uttar pradesh