Home /News /national /

कोरोना आणि मंकीपॉक्सनंतर आता नवं संकट; देशात आढळले Norovirus चे 2 रुग्ण, कसा होतो संसर्ग?

कोरोना आणि मंकीपॉक्सनंतर आता नवं संकट; देशात आढळले Norovirus चे 2 रुग्ण, कसा होतो संसर्ग?

नोरोव्हायरस (Norovirus) प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरला जाणारा एक व्हायरस आहे. त्याशिवाय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीलाही याचा संसर्ग होऊ शकतो.

तिरुअंनतपुरम 06 जून : भारतात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत (Cororna) वाढ होत आहे. तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये मंकीपॉक्सचा (MonkeyPox) धोकाही वाढत आहे. अशातच देशात आणखी एका नव्या व्हायरसचा शिरकाव झाला आहे. केरळची राजधानी तिरुअंनतपुरममध्ये (Thiruvananatpuram) नोरोव्हायरसचे 2 नवे रुग्ण (2 New Cases Of NoroVirus) आढळले आहेत. झी न्यूजच्या वेबसाईटवर याबाबत वृत्त देण्यात आलं आहे. तिरुअनंतपुरममध्ये आढळलेले दोन्ही रुग्ण ही लहान मुलं आहेत. या मुलांची तब्येत स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली (Under Observation) ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर प्रशासनानं आता अत्यावश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसंच नागरिकांच्या चाचण्याही सुरू केल्या आहेत. कोरोनाने आई-वडिलांना नेलं, तरीही बोर्डात Top केलेल्या भावंडांच्या मागे आता Loan रिकव्हरीचा दुर्दैवी फेरा! तिरुअनंतपुरमच्या विझिंजम भागात (Vinzijam) नोरोव्हायरसचे 2 रुग्ण आढळल्याची पुष्टी केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज (Veena George) यांनी केली आहे. ‘केरळची राजधानी तिरुअनंतपुरमच्या विझिंजम परिसरात नोरोव्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. मात्र, काळजीचं काही कारण नाही. आरोग्य विभागाने परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या परिसरातील सँपल्स घेऊन चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसंच आवश्यक त्या उपाययोजनाही वेगाने करण्यात येत आहेत,’ असं ट्विट वीणा जॉर्ज यांनी केलं आहे. त्याचबरोबर संसर्ग झालेल्या दोन्ही मुलांची तब्येत स्थिर असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. नोरोव्हायरस म्हणजे काय? त्याचा संसर्ग कसा होतो? नोरोव्हायरस (Norovirus) प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरला जाणारा एक व्हायरस आहे. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टीनल (Gastrointestinal) आजार होऊ शकतो. दूषित जागेच्या संपर्कात आल्यामुळे किंवा दूषित अन्न पोटात गेल्यामुळे या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. त्याशिवाय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीलाही याचा संसर्ग होऊ शकतो. इतकंच नाही तर नोरो व्हायरसचे अनेक प्रकार असल्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हापुन्हा नोरोव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. नोरोव्हायरसवरील उपाय सुरुवातीच्या तपासण्यांनुसार आतापर्यंत तरी नोरोव्हायरस (Norovirus) जीवघेणा असल्याचं आढळलं नाही; पण आतापर्यंत यावर कोणतंही ठोस औषध उपलब्ध नाही. त्यामुळे तो होऊ न देणं, संसर्गच होऊ नये यासाठी खबरदारी घेणं हाच त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे. केंद्राचं 5 राज्यांना पत्र आणि राज्य सरकार मास्कसक्तीच्या तयारीत, देश कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या उंबरठ्यावर? नोरोव्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांना डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा (Drink Water) आणि हलका आहार (Eat Healthy and Light Food) घेण्याचा सल्ला देतात. दररोज प्राण्यांच्या किंवा जनावरांच्या संपर्कात येणाऱ्यांना याच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. अशा लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. नोरो व्हायरसच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी डॉक्टरांनी साबण आणि कोमट पाण्याने हात स्वच्छ धुण्याचा सल्ला (Hand Wash With Warm Water) दिला आहे. त्याशिवाय ताजं अन्न खाणं महत्त्वाचं आहे. आजारी असल्यासारखं वाटत असेल तर घरीच राहण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. नोरा व्हायरसवर सॅनिटायझरचाही काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे सॅनिटायझरने हात स्वच्छ करूनही काही उपयोग होत नाही. त्यासाठी साबणाने हात धुणंच आवश्यक आहे. नोरोव्हायरसची लक्षणं नोरो व्हायरस (Norovirus) कोणत्याही व्यक्तीच्या पोटावरच हल्ला करतो. हा व्हायरस पोटात पोहोचतो आणि त्यामुळे आतड्यांना सूज येते. संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सहसा अतिसार, उलटी, पोटदुखी आणि गॅस्ट्रोइंटेस्टीनल ही लक्षणं दिसून येतात. त्याशिवाय काही रुग्णांना ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी ही लक्षणंही जाणवतात. नोरो व्हायरसचा संसर्ग कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होऊ शकतो. पण लहान मुलं, ज्येष्ठ किंवा आधीपासूनच एखादा आजार असलेल्यांना संसर्ग झाल्यास ते अधिक गंभीर होऊ शकतो. व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर 12 ते 48 तासांनंतर याची लक्षणं दिसू लागतात. वेळेवर उपचार सुरू झाल्यास संसर्ग झालेली व्यक्ती 3 दिवसांच्या आतही ठीक होऊ शकते . केरळ वगळता सुदैवाने देशाच्या अन्य भागांत आतापर्यंततरी नोरोव्हायरसचे रुग्ण आढळलेले नाहीत; पण तरीही खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणतीही लक्षणं आढळली,तरी लगेचच डॉक्टरकडे जाऊन या.
First published:

Tags: Corona updates, Coronavirus, Disease symptoms, Virus

पुढील बातम्या