मराठी बातम्या /बातम्या /देश /

बकरीसाठी दोघांची निर्घृण हत्या, 12 वर्षांपूर्वी झालेल्या घटनेत न्यायालयाने तिघांना सुनावली फाशीची शिक्षा

बकरीसाठी दोघांची निर्घृण हत्या, 12 वर्षांपूर्वी झालेल्या घटनेत न्यायालयाने तिघांना सुनावली फाशीची शिक्षा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

2 killed for hitting goat: शेतात बकरीने नुकसान केल्याने रागाच्या भरात तिला मारले आणि त्यानंतर संतापलेलल्या बकरीच्या मालकाने दोघांची धारदार शस्त्राने हत्या केली होती.

  • Published by:  Sunil Desale

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : शेतात बकरी शिरली आणि शेतीचं नुकसान (crop damage) झाल्याने रागाच्या भरात शेतमालकाने बकरीला मारले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या बकरीच्या मालकाने दोघांची हत्या (two brutally murdered) केली होती. 12 वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. त्या प्रकरणात न्यायालयाने आता निकाल दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणात तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

उत्तप्रदेशातील (Uttar Pradesh) मऊ जनपद येथील भिखारीपूर परिसरात 12 वर्षांपूर्वी दोन व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. फास्ट ट्रकॅ कोर्टाने हा निकाल दिला आहे. दोषी अकलू चौहान, जयचंद, रामसरन यांना फाशीची शिक्षा सुनावली असून यासोबतच दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

वाचा : खरेदीसाठी आले अन् दरोडा टाकून बाहेर पडले; पाहा घटनेचा धक्कादायक CCTV

काय आहे संपूर्ण प्रकरण?

उत्तप्रदेशातील मऊ जनपद येथील भिखारीपूर येथे 7 मार्च 2009 रोजी अकलू चौहान याच्या बकरीने शेतात शिरुन धान्याचं नुकसान केलं होतं. त्यानंतर त्या बकरीला करण्यात आलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. मग संतापलेल्या अकलू चौहान याने आपल्या दोन साथिदारांसोबत मिळून राम सनेही यांची धारदार शस्त्राने हत्या केली. राम सनेही यांचा आवाज ऐकून बचावासाठी आलेल्या पब्बरलाही गोळी झाडून मारण्यात आले.

या प्रकरणी राम सनेही यांची मुलगी तुलसी गुप्ता हिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अकलू चौहान, जयचंद आणि रामसरन यांना अटक केली होती. या प्रकरणाचा खटला 12 वर्षे सुरू होता. अखेर आता न्यायालयाने तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

वाचा : 6 महिने आईच्या मृतदेहासोबत राहिली मुलगी; कारण जाणून बसेल धक्का

कुटुंबीयांकडून तरुणीची हत्या, जळत्या चितेवरून पोलिसांनी उचलला मृतदेह

हरियाणात आपल्या मनाविरुद्ध लग्न करणाऱ्या तरुणीची तिच्या कुटुंबीयांनी हत्या करून तिला गुपचूप जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गुपचूप जाळला जात असताना पोलिसांना खबर मिळाली आणि त्यांनी स्मशानभूमीत धाव घेत जळत्या चितेवरून मृतदेह उचलून नेला.

हरियाणातील फतेहाबादमध्ये राहणाऱ्या अनुप आणि शिक्षा यांचं एकमेकांवर प्रेम होतं. गेल्या वर्षी त्यांनी कुणालाही कल्पना न देता प्रेमविवाह केला होता. मात्र त्यानंतर करिअर सेट होईपर्यंत आपापल्या घरी राहण्याचा निर्णय़ घेतला होता. नुकतीच शिक्षाला चंदीगढमध्ये नोकरी लागली होती. त्यानंतर अनुपही चंदिगढला गेला आणि दोघं एकत्र राहू लागले. तीन दिवसांपूर्वीच शिक्षाच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी शिक्षाला धडा शिकवण्याचा कट रचला.

शिक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असून तिचं आपण थाटामाटात लग्न लावून देऊ, असं सांगत तिच्या कुटुंबीयानी तिला घरी बोलावलं. मात्र घरी आल्याच्या दोन दिवसांनंतर तिचा खून करण्यात आला आणि तिचा मृतदेह गुपचूप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुणालाही कल्पना न देता तिच्यावर अंत्यसंस्कार करून सर्व पुरावे मिटवून टाकण्याचा तिच्या कुटुंबीयांचा डाव होता. मात्र पती अनुपला एकाने फोन करून घटनेची कल्पना दिली आणि शिक्षाचा खून झाल्याचं सांगितलं. हे ऐकून धक्का बसलेल्या अनुपनं पोलिसांना फोन केला आणि घटनेची कल्पना दिली.

First published:

Tags: Crime, Murder, Uttar pardesh