Elec-widget

गौरी लंकेश हत्या प्रकरण: एक संशयित ताब्यात

गौरी लंकेश हत्या प्रकरण: एक संशयित ताब्यात

सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे.मंगळवारी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती

  • Share this:

बंगळुरू, 05 सप्टेंबर : गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी  एका संशयिताला  ताब्यात घेतल्याचं वृत्त हाती आलं आहे. सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे.

मंगळवारी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. चार गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या. पोलिसांना जलद वेगाने तपासाला सुरुवात केली होती. कर्नाटक सरकारने या प्रकरणी   एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहे. पोलीस सहआयुक्त सतीश या प्रकरणाचा तपास घेत आहे.

 

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटक सरकारकडून  अहवाल मागवला आहे  राहुल गांधीनीही या हत्येचा निषेध केला आहे. या घटनेशी संघ किंवा भाजपचा  काही संबंध नसल्याचं वक्तव्य नितीन  गडकरींनी केलं आहे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2017 01:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...