Elec-widget

सामुहिक बलात्काराच्या घटनेनं बिहार हादरलं, वडिलांसमोर तरूणीवर अत्याचार

सामुहिक बलात्काराच्या घटनेनं बिहार हादरलं, वडिलांसमोर तरूणीवर अत्याचार

सामुहिक बलात्काराच्या घटनेनं बिहार हादरलं आहे. पाणी पिण्याचं निमित्त करत सहा नराधमांनी 19 वर्षाच्या तरूणीवर वडिलांच्या डोळ्यादेखत बलात्कार केला.

  • Share this:

7 फेब्रुवारी, पटणा : सामुहिक बलात्काराच्या घटनेनं बिहार हादरलं आहे. पाणी पिण्याचं निमित्त करत सहा नराधमांनी 19 वर्षाच्या तरूणीवर वडिलांच्या डोळ्यादेखत बलात्कार केला. मंगळवारी रात्री ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून नरधमांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वडिलांच्या डोळ्यादेखत बलात्कार

बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील 19 वर्षाच्या तरूणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री सहा नराधम पीडित तरूणीच्या घरी पाणी पिण्याचं निमित्त करून घुसले. त्यानंतर त्यांनी पीडितेच्या वडिलांना झाडाला बांधून तरूणीचे लचके तोडले. दरम्यान, पोलिस तक्रार दाखल केल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी देखील या नराधमांनी पीडितेच्या वडिलांना दिली. बुधवारी यासंदर्भात कोढोवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील सहाही नराधम अद्याप फरार असून लवकरच त्यांना बेड्या ठोकू असे जिल्हा पोलीस अधिक्षक आशिष कुमार यांनी सांगितले.


'हे' गाणं एकून उदयनराजेंच्या डोळ्यात आलं पाणी; VIDEO VIRAL


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 04:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...