लखनऊ, 1 जानेवारी : धुक्यामुळे अनेकदा वाहन चालकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. धुक्यामुळे अपघाताच्याही अनेक घटना समोर आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना नव-वर्षाच्या सुरुवातीलाच समोर आली आहे. धुक्यामुळे ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस-वेवर मोठा अपघात झाला आहे. दाट धुक्यामुळे तब्बल 18 गाड्या एकमेकांवर धडकल्या आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, बागपतमध्ये धुक्यामुळे भयंकर अपघात झाला आहे. तब्बल 18 गाड्या एकमेकांवर आदळल्या. घटनेची माहिती मिळताच, प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून एक्स्प्रेस-वे खाली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या गंभीर अपघातात अनेक जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ बागपतच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातील अनेक भागात थंडीचा कडाका पाहायला मिळतो आहे. दिल्लीत तापमानाचा पारा तब्बल 1.1 डिग्री सेल्सियलवर पोहचला आहे. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात सकाळी दाट धुकं पसरलं होतं. दाट धुक्यामुळे व्हिजिबिलिटी शून्य झाली होती आणि त्यामुळे वाहतूकीच्या गतीवरही याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला.
थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचं आंदोलनही सुरूच आहे. दिल्लीत आंदोलन करत असलेले शेकडोंच्या संख्येत शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत 1 ते 2 डिग्री सेल्सियलमध्ये आंदोलन सुरूच ठेवलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 3 ते 5 जानेवारीदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.