Home /News /national /

बापाने पॉर्न दाखवून केली बलात्काराला सुरुवात; बड्या नेत्यांसह 28 जणांनी तरुणीला दिल्या नरक यातना

बापाने पॉर्न दाखवून केली बलात्काराला सुरुवात; बड्या नेत्यांसह 28 जणांनी तरुणीला दिल्या नरक यातना

एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापासह 28 जणांनी अमानुष पद्धतीने बलात्कार (Minor girl raped by 28 people including father) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    ललितपूर, 13 ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी मुंबईनजीक असणाऱ्या डोंबिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी बलात्कार (Minor girl gang rape) केल्याची घटना उघडकीस आली होती. नराधमांनी पीडित मुलीला विविध ठिकाणी नेत सामूहिक अत्याचार केला होता. ही घटना ताजी असताना आता एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापासह 28 जणांनी अमानुष पद्धतीने बलात्कार (Minor girl raped by 28 people including father) केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे बलात्कार करणाऱ्यांमध्ये काही बड्या राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील आहे. येथील एक 17 वर्षीय पीडित मुलगी इयत्ता सहावीत शिकत असताना, तिच्या वडिलांनी तिला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच घटनेची वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या आईला जीवे मारेल अशी धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेनं बापाचा अत्याचार निमूटपणे सहन केला. पण काही दिवसानंतर आरोपी बापानं आपल्या पोटच्या लेकीला गुंगीचं औषध देऊन एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. याठिकाणी एका अज्ञाताने पीडितेवर अत्याचार केला. हेही वाचा-बदनामी टाळण्यासाठी गॅलरीत लपायला गेली अन्...; इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू यानंतर पुढील अनेक महिने पीडितेवर वेगवेगळ्या पुरुषांकडून अमानुष पद्धतीने अत्याचार केला आहे. नराधम आरोपींमध्ये काही नातेवाईक आणि राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. यासोबत पीडित मुलीच्या आजीने देखील आरोपींना अत्याचारात मदत केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. शरीरसंबंधास नकार दिल्यास तरुणीला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी नराधम द्यायचे. हेही वाचा-सोलापुरात मुलाचं आईसोबत राक्षसी कृत्य; झोपलेल्या जागीच डोक्यात घातला दगड अन्... गेल्या काही वर्षांपासून नराधमांकडून होणारा अत्याचार सहन केल्यानंतर पीडितेनं अखेर ललितपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असून आरोपी वडिलांसह, ललितपूर सपाचे जिल्हाध्यक्ष, सपाचे शहराध्यक्ष, बसपाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह तब्बल 28 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Rape on minor, Uttar pradesh

    पुढील बातम्या