Home /News /national /

बारावीच्या परीक्षेसाठी आलेल्या 17 वर्षाच्या मुलाला Heart Attack; परीक्षा केंद्रावरच कोसळला

बारावीच्या परीक्षेसाठी आलेल्या 17 वर्षाच्या मुलाला Heart Attack; परीक्षा केंद्रावरच कोसळला

heart attack

heart attack

सतीश परीक्षेसाठी दररोज गावातून शहराकडे जात होता. घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, पोलीस तपासणीनंतर विद्यार्थ्यांना आत सोडत असताना रांगेतच त्याला अचानक घाम फुटला आणि तो जमिनीवर कोसळला.

    तिरुपती, 11 मे : बारावीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या विद्यार्थ्याची परीक्षा केंद्रावर आल्यानंतर परीक्षेसाठी आत सोडलं जात असताना पोलिसांच्या तपासणीतून जात असताना तब्येत बिघडली. त्याला परीक्षा केंद्राबाहेर अचानक छातीत दुखू लागलं. याविषयी त्याने एका पोलीस अधिकाऱ्याला आपली अडचण सांगितली. हा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचला होता आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यानुसार केलेल्या तपास प्रक्रियेतून जात होता. तेव्हा त्याने छातीत दुखत असल्याबद्दल एका पोलिस अधिकाऱ्याला सांगितलं. या अधिकाऱ्याने त्याला जवळच बसवून घेतलं. मात्र, त्याला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. याविषयी त्याने पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं असता त्या अधिकाऱ्यानं रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णवाहिका काही अंतरावर असल्याने आणि सतीशला तातडीने उपचाराची गरज असल्यानं अधिकाऱ्यांनी त्यांला त्यांच्या वाहनातून रुग्णालयात नेलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यानं या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. येकोल्लू वेंकट सतीश असं या 17 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून, तो आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथे 12 वीची इंटरमीजिएट परीक्षा देण्यासाठी जात होता. तो गुडूरमध्ये श्री स्वरंध्र भारती कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होता. मंगळवारी तो इंग्रजी इंटरमिजिएट परीक्षेला बसण्याच्या तयारीने आला होता. तेव्हा त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हे वाचा - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलचे भांडण विकोपाला, प्रियकराने GFलाच संपवलं कम्मावरीपल्ली गावचा राहणारा सतीश हा गुडुरू येथील एका खासगी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. सध्या सुरू असलेल्या वार्षिक परीक्षांना बसण्यासाठी तो दररोज गावातून शहराकडे जात होता. घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, त्याला अचानक घाम फुटला आणि तो जमिनीवर कोसळला. हे वाचा - राजद्रोहाचं कलम 124 अ तूर्तास स्थगित, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय या घटनेची माहिती मिळताच त्याच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि त्यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Death, Heart Attack, Student

    पुढील बातम्या