मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! गुंगीचं औषध देत 17 मुलींवर लैंगिक अत्याचार; शाळेच्या मॅनेजरनं प्रॅक्टिकलच्या बहाण्याने नेलं अन्...

धक्कादायक! गुंगीचं औषध देत 17 मुलींवर लैंगिक अत्याचार; शाळेच्या मॅनेजरनं प्रॅक्टिकलच्या बहाण्याने नेलं अन्...

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Rape on 17 School Girl: एका खाजगी शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिंनींना प्रॅक्टिकलच्या बहाण्याने दुसऱ्या शाळेत घेऊन जात त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुजफ्फरनगर, 07 डिसेंबर: एका खाजगी शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिंनींना प्रॅक्टिकलच्या बहाण्याने दुसऱ्या शाळेत घेऊन जात त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा (Attempt to rape and molest) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम आरोपी दुसरे तिसरे कोणी नसून संबंधित शाळेचे व्यवस्थापक आहेत. नराधम आरोपींनी 17 मुलींना प्रॅक्टिकलच्या बहाण्याने दुसऱ्या शाळेत घेऊन जात त्यांच्यासोबत अमानुष कृत्य केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पोक्सोसह (POCSO) विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्याच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत (Private school) घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजफ्फरनगर येथील योगेशने सूर्य देव पब्लिक स्कूलमधील 10वीत शिकणाऱ्या 17 मुलींना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी जीजीएस स्कूलमध्ये नेण्यात आलं होतं. प्रॅक्टिकलच्या निमित्ताने संबंधित मुलींना एक रात्र त्याच शाळेत राहावं लागणार होतं. या संधीचा फायदा त्यांना प्रॅक्टिकलसाठी घेऊन जाणाऱ्या दोन व्यवस्थापकांनी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत.

हेही वाचा-खाऊ आणायला गेलेल्या चिमुकलीवर दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार; कोल्हापुरातील घटना

आरोपींनी पीडित मुलींना नशा येणारं पदार्थ देऊन त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी केला आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी घटनेची वाच्यता न करण्याबाबत विद्यार्थिनींना धमकी देखील दिली होती. याप्रकरणी पीडित मुलींचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, पोलिसांनी देखील त्यांच्या तक्रारीकडे कानाडोळा केला आहे.

हेही वाचा-सुनेला खोलीत कोंडून सासऱ्याचं विकृत कृत्य; हिंगोलीतील धक्कादायक घटना

अखेर एका आमदाराने हस्तक्षेप केल्यानंतर, पोलिसांनी सूर्यदेव पब्लिक स्कूलचे संचालक योगेश कुमार चौहान आणि जीजीएस इंटरनॅशनल स्कूलचे संचालक अर्जुन सिंग यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, नशेचे पदार्थ देणे आणि पॉक्सो कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर शाळेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच अनेक नातेवाईकांनी शाळेविरोधात संताप व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Rape on minor, Uttar pradesh