Home /News /national /

जिगरबाज! गंगेत वाहून जात होती आई, 16 वर्षीय लेकीनं जीव धोक्यात टाकून नदीत उडी मारली आणि...

जिगरबाज! गंगेत वाहून जात होती आई, 16 वर्षीय लेकीनं जीव धोक्यात टाकून नदीत उडी मारली आणि...

गंगा नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या आईला वाचवण्यासाठी 16 वर्षीय लेकीनं जवळजळ 20 मिनिटं धडपड केली.

    जोशीमठ, 08 जून : आई मुलांसाठी अनेक गोष्टींचा त्याग करते, या सगळ्याची जाणीवही ती मुलांना होऊ देत नाही. मात्र आजकाल मुलं आपल्या आईनं केलेल्या त्यागाची जाणही ठेवत नाही. अशातच एक जिगारबाज लेकीनं आपला जीव धोक्यात टाकून आईचे प्राण वाचवले. गंगा नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या आईला वाचवण्यासाठी 16 वर्षीय लेकीनं जवळजळ 20 मिनिटं धडपड केली. ही घटना रविवारी घडली. नेपाळी वंशाच्या रामकली देवी आणि त्यांची 16 वर्षीय लेक किरण तपोनवातील धौली गंगा नदीच्या काठावर लाकडं गोळा करत होती. याचदरम्यान रामकली देवी यांचा पाय घसरला आणि त्या नदीत पडल्या. आईला पाण्यात बुडताना पाहून 16 वर्षीय किरणनं पुढचा मागचा विचार न करता गंगेत उडी टाकली. तिनं आईचा वाचवण्यासाठी तब्बल 20 मिनिटे प्रयत्न केले. अखेर रामकली देवी यांना बाहेर काढण्यात यश आलं. वाचा-काही दिवसांत बदललं पुण्याचं चित्र, कोरोनाबाबत ही आहे POSITIVE NEWS प्रत्यक्षदर्शी ओम प्रकाश डोभाल यांनी याबाबत सांगितले की, आईचे प्राण वाचवण्यासाठी नदीत उडी मारलेली किरणही वाहता वाहता वाचली. तरी तिनं धाडस दाखवून आपल्या आईचे प्राण वाचवले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोकं घटनास्थळी जमा झाले. स्थानिकांनी रामकली देवी यांना जोशीमठातील रुग्णालयात दाखल केले. तर किरणच्या धाडसाचं कौतुक सर्वजण करत असून तिला जिगरबाज किरण असं नाव देण्यात आलं आहे. वाचा-PHOTOS : बाप रे! 126 वर्ष जुन्या पिंपळाच्या झाडात घर आहे की घरात झाड वाचा-बऱ्याच दिवसांनी दिलासादायक बातमी, 'या' दिवशी महाराष्ट्रात मान्सून होणार दाखल
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या