मराठी बातम्या /बातम्या /देश /महाराष्ट्रानंतर आता देशातील या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा कहर; आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रानंतर आता देशातील या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा कहर; आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

किश्तवाड जिल्ह्यातील एका गावात (Honzar village in Kishtwar) बुधवारी पहाटे 4.30 वाजत ढगफुटी होऊन सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 17 जण जखमी झाले आहेत.

किश्तवाड जिल्ह्यातील एका गावात (Honzar village in Kishtwar) बुधवारी पहाटे 4.30 वाजत ढगफुटी होऊन सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 17 जण जखमी झाले आहेत.

किश्तवाड जिल्ह्यातील एका गावात (Honzar village in Kishtwar) बुधवारी पहाटे 4.30 वाजत ढगफुटी होऊन सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 17 जण जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली 29 जुलै : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) तसंच लडाख येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात बुधवारी 16 जणांनी प्राण गमावले आहेत. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील एका गावात (Honzar village in Kishtwar) बुधवारी पहाटे 4.30 वाजत ढगफुटी होऊन सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 17 जण जखमी झाले आहेत. तर, हिमाचल प्रदेशात अचानक आलेल्या पुरामुळे (Flash Flood Due to a Cloudburst) 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण बेपत्ता आहेत. लडाखमध्येही कारगिलच्या विविध क्षेत्रांमध्ये ढगफुटी झाल्यानं 12 घरं आणि शेतातील पिकांचं नुकसान झालं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमनं बचावकार्य (Rescue) सुरू केलं आहे.

हिमाचल प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुदेशकुमार मोखता यांनी सांगितलं की, लाहौल-स्पीती येथील उदयपूरच्या तोजिंग नाल्यात आलेल्या पूरात सात लोकांचा जीव गेला आहे, दोघं जखमी आहेत तर तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. तर चंबा येथेही दोन लोकांचा मृत्यू झाला. कुल्लू जिल्ह्यात एक महिला, तिचा मुलगा, जलविद्युत प्रकल्प अधिकारी आणि दिल्ली येथील एका पर्यटकासह चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

काळजाचा ठोका चुकवेल हा VIDEO! दूधसागर रोरावत ट्रेनवर कोसळला, निम्मी ट्रेन गायब

मोखता यांनी सांगितलं की, लाहौलच्या उदयपुरात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पूरात दोन मजूर आणि एक खासगी जेसीबी मशीन वाहून गेली. उदयपुरातल्या तोजिंग नाल्यात झालेल्या पूरात 12 मजूर वाहून गेले. यापैकी सात मृतदेह ताब्यात घेण्यात आले, दोघांची सुटका करण्यात आली आणि तीन अद्याप बेपत्ता आहेत. लाहौल-स्पितीचे उपायुक्त नीरज कुमार म्हणाले की, भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम कार्यरत आहे.

बापरे बाप! कामगारांच्या डोळ्यांदेखत राक्षसी भूस्खलन, खाणीत दरड कोसळल्याचा Video

जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीत नाल्याच्या काठावर असलेली 19 घरे, 21 गौशाला आणि रेशन डेपोचंही नुकसान झालं आहे. दच्चन तहसीलच्या होन्जार गावात ढगफुटीमुळे बेपत्ता झालेल्या 14 जणांचा शोध घेण्यासाठी पोलीस, सैन्य आणि राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ) यांच्यामार्फत शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ढगफुटी झालेल्या किश्तवाडमधील गावातून सात मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत, तर इतर 17 जणांना वाचविण्यात आलं आहे. जीव गमावणाऱ्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. 14 बेपत्ता लोकांचा शोध अद्याप सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Himachal pradesh, Jammu and kashmir, Rain fall, Rain flood