मराठी बातम्या /बातम्या /देश /

16 व्या वेळेसचं गर्भारपण जीवावर बेतलं; भररस्त्यात माय-लेकांनी सोडला जीव

16 व्या वेळेसचं गर्भारपण जीवावर बेतलं; भररस्त्यात माय-लेकांनी सोडला जीव

 या घटनेनंतर ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाबाबत केलं जाणारं दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

या घटनेनंतर ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाबाबत केलं जाणारं दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

या घटनेनंतर ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाबाबत केलं जाणारं दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

    भोपाळ, 11 ऑक्टोबर : मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यातील बटियागढ़ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम पाडाझिरमध्ये एका 45 वर्षीय महिलेने शनिवारी आपल्या 16 व्या बाळाला जन्म दिला. आशा कार्यकर्ता कल्लो बाई विश्वकर्मा यांनी रविवारी सांगितले की, पाड़ाझिर निवासी सुखरानी अहिरवार यांनी शनिवारी आपल्या 16 वर्षीय मुलाला जन्म दिला. प्रसुतीदरम्यान तिची प्रकृती ढासळली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला व तिच्या जन्मजात बाळाला तातडीने रुग्णालयात हलवलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रस्त्यात बाळासह आईचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, महिला 16 व्या वेळेस आई झाली होती. महिलेला 15 मुलं आहेत. यामध्ये 4 मुलगे आणि 4 मुली. तर उरलेल्या 7 मुलांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. पाडाझिर गाव हे दमोह जिल्हा मुख्यालयापासून साधारण 50 किमी लांब आहे. यादरम्यान दमोह जिल्ह्याचे मुख्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी डॉ. संगीता त्रिवेदी यांनी सांगितले की, इतक्या योजना असतानाही या महिलेचं कुटुंब नियोजनाअंतर्गत समावेश नसणं ही धक्कादायक बाब आहे. या प्रकरणाचा तपास करणं आवश्यक असून दोषी असलेल्यावर कारवाई करण्याची गरज आहे. हे ही वाचा-चोरी केली म्हणून बेदम मारलं; गुप्तांगात दिला करंट, तरुणाची प्रकृती गंभीर सरकारकडून कुटुंब नियोजनाच्या विविध योजना दिल्या गेल्या आहेत. यामध्ये छोटं कुटुंब सुखी कुटुंब असा संदेश देण्यात आला आहे, असे असतानाही या महिलेने 16 वेळा आई होणं तिच्या आरोग्यासाठीही धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. महिला तब्बल 45 वर्षांती होती. या वयात प्रसूती ही अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे अशा प्रकरणात चौकशी करीत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेनंतर ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाबाबत केलं जाणारं दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Small baby

    पुढील बातम्या