हायअलर्ट; किनारपट्टी मार्गे 15 दहशतवादी केरळमध्ये घुसण्याची शक्यता

हायअलर्ट; किनारपट्टी मार्गे 15 दहशतवादी केरळमध्ये घुसण्याची शक्यता

केरळमध्ये पुन्हा एकदा ISIS या दहशतवादी संघटनेच्या हलचाली वाढल्याचे वृत्त आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे: केरळमध्ये पुन्हा एकदा ISIS या दहशतवादी संघटनेच्या हलचाली वाढल्याचे वृत्त आहे. शनिवारी रात्री केरळच्या समूद्र किनाऱ्यावर ISISच्या दहशतवाद्यांच्या हलचालांची माहिती मिळाल्यानंतर हायअलर्ट देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्लोखारापैकी एक जण केरळमधील होता असे वृत्त समोर आले आहे.

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केरळ पोलिसांनी किनारपट्टी भागात अलर्ट दिला आहे. यासाठी सिनिअर अधिकारी देखील तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार गुप्तचर विभागाकडून आम्हाला अनेक वेळा अलर्ट दिला जातो. पण यावेळी दहशतवाद्यांच्या संख्येसह अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळेच या संदर्भात तातडीने कारवाई करत किनारपट्टी भागाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. किनारपट्टी भागातील पोलिसांनी सांगितल्यानुसार यासंदर्भात काही दिवसांपूर्वी अलर्ट मिळाला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पालक्काड येथील 29 वर्षीय तरुणाला दहशतवादी कट रचण्याच्या आरोपात अटक केली होती. ISISचा कासरकोड मॉडेल प्रकरणात ही बाब समोर आली होती. रियास ए उर्फ रियास अबूबकर उर्फ रियास अबू दुजाना असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.  चौकशी दरम्यान रियासने श्रीलंका हल्ल्यातील मास्टर माइड जहरान हाशिम याच्यापासून प्रेरणा घेतल्याचे कबूल केले. तो गेल्या एक वर्षापासून हाशिमचे भाषण आणि व्हिडिओ ऐकत होता. त्याच बरोबर वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकिर नाईकचे भाषण देखील रियास ऐकत असे.

VIDEO: काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर?

First published: May 26, 2019, 7:05 AM IST

ताज्या बातम्या