दिल को संभालो! तासाला 148 भारतीयांचा होतोय हृदयविकारानं मृत्यू

दिल को संभालो! तासाला 148 भारतीयांचा होतोय हृदयविकारानं मृत्यू

पुढच्या दोन वर्षात एक दोन नव्हे तर तब्बल 26 लाख भारतीयांचा ह्रदयविकारानं मृत्यू होणार आहे. आणि त्याला याच बाबी कारणीभूत राहणार असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केलाय.

  • Share this:

मुंबई, 5 ऑक्टोबर : तुम्ही जागरण करता? चमचमीत तेलकट तुपकट खाता? वाहानाशिवाय तुमचं पान हालत नाही? व्यायाम केवळ तुमच्या नववर्षाच्या संकल्पात असतो? पायी चालणं कमी झालंय? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण पुढच्या दोन वर्षात एक दोन नव्हे तर तब्बल 26 लाख भारतीयांचा ह्रदयविकारानं मृत्यू होणार आहे. आणि त्याला याच बाबी कारणीभूत राहणार असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केलाय.

भारतात सद्या मिनिटाला 2 ते 3 जणांचा, तासाला 148 जणांचा, दिवसाला 3,561 जणांचा, वर्षाला 13 लाख जणांचा, तर दोन वर्षात 26 लाख जणांचा ह्रदयविकारानं मृत्यू होतो. पुढच्या दोन वर्षात म्हणजेच 2020 पर्यंत ह्रदयरोगामुळं तब्बल 26 लाख भारतीयांचा मृत्यू होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय. विषेश म्हणजे तरुण पिढीला याचा सर्वाधिक धोका संभवतोय.

पारंपरिक कोरोनरी आर्टरी डिसिज हे याचं प्रमुख कारण आहे. कार्डिओव्हस्क्युलर आजार ही जागतिक समस्या बनली आहे. 2030 पर्यंत कार्डिओव्हस्क्युलरमुळं मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण137 टक्क्यांवर जाणार आहे. तसेच पारंपरिक कोरोनरी आर्टरी डिसिजचा सर्वाधिक धोका हा 30 ते 69 वयाच्या व्यक्तींना संभवतोय.

पारंपरिक कोरोनरी आर्टरी डिसिजमध्ये ह्रदयाला रक्त, ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यामध्ये कॉलेस्ट्रॉलमुळं अडथळा निर्माण होतो किंवा सूज येते. त्यामुळं रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि ह्रदय विकार बळावतो. मात्र वेळीच वेळोवेळी आरोग्य तपासणी केल्यास ह्रदय रोगाचा धोका टाळता येतो.

खरं तर ह्रदयविकार हा जीवनशैलीशी निगडीत आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार तीन चतुर्थांश कार्डिओव्हस्क्युलर हा आजार केवळ योग्य जीवनशैलीचा अवलंब करुन टाळता येतो. तुमचं ह्रदय तरुण राहावं यासाठी पौष्टीक आहारासोबतच नियमीत चालणं, व्यायाम करणं गरजेचं आहे. ह्रदय तरुण राहावं यासाठी आजचं सकल्प करा, अन्यथा या आजाराचे तुम्हीही बळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

काय आहे पारंपरिक कोरोनरी आर्टरी डिसिज ?

ह्रदयाच्या रक्त वाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो. रक्त वाहिन्याला सूज येते. रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि यामुळे ह्रदय विकार बळावतो.

 पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेचे भीषण PHOTOS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 11:14 PM IST

ताज्या बातम्या