टिपू सुलतानच्या जयंतीला बेळगावमध्ये जमावबंदी

टिपू सुलतानच्या जयंतीला बेळगावमध्ये जमावबंदी

बेळगावमधील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी हा निर्णय पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी घेतला आहे.

  • Share this:

बेळगाव,10 नोव्हेंबर:आज टिपू सुलतानची जयंती आहे. यामुळे बेळगावात वाद होण्याची शक्यता आहे.म्हणून बेळगाव शहरात कलम144 लागू करण्यात आलं आहे

टिपू सुलतान हा म्हैसूर संस्थानांचा शासक  होता. तो हिंदूविरोधी असल्याचे तसंच त्याने हिंदूवर अनेक अत्याचार केल्याचे आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केले आहेत. तर दुसरीकडे त्याला एक धर्मनिरपेक्ष शासक म्हणून पाहिले जाते आहे. हिंदुत्ववादी संघटनांचा टिपू सुलतान जयंतीला विरोध आहे. बेळगावात काही संघटना टिपू सुलतानची जयंती साजरी करू शकतात. यावरून दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये जुंपू शकते. म्हणून शहरात 144 कलम आज लागू करण्यात आलं आहे. बेळगावमधील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी हा निर्णय पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 08:54 AM IST

ताज्या बातम्या