मराठी बातम्या /बातम्या /देश /

टॅटू काढणे आले अंगाशी, 14 तरुणांना HIV ची लागण, घटनेने शहरात खळबळ

टॅटू काढणे आले अंगाशी, 14 तरुणांना HIV ची लागण, घटनेने शहरात खळबळ

 वाराणसीमध्ये सुमारे 14 तरुणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

वाराणसीमध्ये सुमारे 14 तरुणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

वाराणसीमध्ये सुमारे 14 तरुणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

    वाराणसी, 7 ऑगस्ट : गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये टॅटू बनवण्याची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. मात्र, अनेकदा फॅशनमुळेही समस्या निर्माण होतात. असाच एक धक्कादायक प्रकार धर्मनगरी वाराणसीमध्ये समोर आला आहे. याठिकाणी 14 तरुणांना एकाच सुईने टॅटू काढल्याने एचआयव्हीची लागण झाली आहे. टॅटू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुईमुळे संसर्ग पसरला असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. तर या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीमध्ये सुमारे 14 तरुणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले आहे. संसर्ग झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून समुपदेशन व तपासणी केली असता सर्वांची तारांबळ उडाली. सर्व तरुणांमध्ये एचआयव्ही संसर्गाची मूळ कारणे सापडत नाहीत. प्रत्येकाने आपल्या शरीरात कुठेतरी टॅटू काढले होते. अशा स्थितीत या सर्व रुग्णांना संसर्ग झालेल्या सुईने टॅटू काढल्याने एचआयव्हीची लागण झाल्याची नव्वद टक्क्यांपर्यंत भीती आरोग्य विभागाला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हा रुग्णालयाच्या अँटी रेट्रो व्हायरल उपचार केंद्रातून सर्वांवर उपचार सुरू झाले आहेत. रूग्णालयाच्या अँटी रेट्रो व्हायरल ट्रीटमेंट सेंटरच्या डॉ. प्रीती अग्रवाल यांनी सांगितले की, हे सर्व तरुण आहेत आणि त्यांच्या शरीरावर कुठूनतरी टॅटू बनवले आहेत. हेही वाचा - मेव्हणीच्या लग्नाला नकार, प्रियकराबरोबरच मेव्हणाही चढला टॉवरवर; असा रंगला खेळ तर अँटी रेट्रो व्हायरल ट्रीटमेंट सेंटरच्या समुपदेशक सुषमा तिवारी यांनी सांगितले की, टॅटू काढणारी सुई खूप महाग असते. म्हणूनच टॅटू बनवणारे लोक बराचसा खर्च वाचवण्यासाठी यात्रेमध्ये एकाच सुईने अनेक लोकांचे टॅटू बनवतात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही संसर्ग झाला असेल, तर इतर सर्व लोकांना त्याच सुईतून संसर्ग होतो. अशा परिस्थितीत तरुणांनी टॅटू काढताना सुई आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Uttar pradesh news, Varanasi

    पुढील बातम्या