गुरुग्राम, 06 मे : सोशल मीडियावर एका मुलीनं विनयभंगाचा आरोप केल्यानंतर गुरुग्राममधील 14 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सोमवारी (4 मे) रोजी या 14 वर्षांच्या मुलानं इमारतीच्या 11व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. या 14 वर्षांच्या मुलासह इतरांवर इंस्टाग्रामचा वापर करत सामूहिक बलात्काराचा प्लानिंग केल्याचे आरोप करण्यात आले होते. या मुलांचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आत्महत्या केलेल्या मुलाचेही नाव यात सामिल होते.
दरम्यान, या आत्महत्येप्रकरणी कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या मुलाच्या फोनवरून आलेल्या मेसेजवरून काही विद्यार्थ्यांकडून पोलिसांकडून त्याची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या मुलानं आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सोशल मीडियावर MeToo पोस्ट टाकलेल्या मुलीनं तिच्यावर तीन वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. हा हल्ला केलेल्या मुलांचे चॅट आणि त्यांची नावं तिनं सोशल मीडियावर टाकली होती.
वाचा-हिज्बुलच्या कमांडर रियाझ नायकू खात्मा; गणिताचा शिक्षक कसा झाला क्रूरकर्मा?
याआधी या इन्स्टाग्राम ग्रुपमध्ये 'बॉइज लॉकर रूम' नावाचा ग्रुप होता. यात सगळी शाळकरी मुलं होती. हे चॅट एका ट्विटर युझरने शेअर केलं आहे, जे वाचून सगळ्यांनाच धक्का बसला. यात एक मुलगा मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यासाठी इतरांना भडकवत असल्याचं समोर आलं. तसेच यात मुलींचे आक्षेपार्ह फोटोही शेअर करण्यात आले होते. दक्षिण दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका मुलीनं हे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकले. त्यानंतर नेटकऱ्यांनी या मुलांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी सर्व मुलांची माहिती मिळवून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याचदरम्यान या 14 वर्षीय मुलानं आत्महत्या केली.
वाचा-विविध जिल्ह्यात अडकलेले नागरिक कसे पोहोचणार घरी? सरकारनं घेतला मोठा निर्णय
लोकांनी सोशल मीडियावर या ग्रुपविरूद्ध लिखाण सुरू केलं आणि ट्विटरवर #boislockerroom ट्रेंड करत आहे. ते थांबवून कडक कारवाई करण्याची मागणी लोक करीत आहेत. असं सांगितलं जात आहे की, या ग्रुपमधली बहुतेक मुलं दक्षिण दिल्लीची आहेत.या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना अटक केली आहे तर, या 14 वर्षीय मुलाच्या आत्महत्येबाबत पुढील तपासही पोलीस करत आहेत.
वाचा-कोरोनाचा आपोआपच नाश होणार? शास्त्रज्ञांना दिसून आला व्हायरसमध्ये विशेष बदल