मराठी बातम्या /बातम्या /देश /

सरकारी रुग्णालयातील 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू, ऑक्सिजनअभावी जीव गमावल्याचा नातेवाईकांचा आरोप

सरकारी रुग्णालयातील 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू, ऑक्सिजनअभावी जीव गमावल्याचा नातेवाईकांचा आरोप

Corona नंतर या आजाराची वाढली भिती

Corona नंतर या आजाराची वाढली भिती

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एका सरकारी रुग्णालयात (Government Hospital) शनिवारी 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळं खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप या रुग्णांच्या मृत्यूच्या कारणाविषयी माहिती देण्यात आलेली नाही.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 2 मे : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एका सरकारी रुग्णालयात (Government Hospital) शनिवारी 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळं खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप या रुग्णांच्या मृत्यूच्या कारणाविषयी माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, रुग्णालयात हजर असलेल्या लोकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या कोविड रुग्णांचा (Corona Patients) मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तर रुग्णालय प्रशासनाने ही बाब अफवा असल्याचे म्हटले आहे. या रुग्णांच्या मृत्यूनंतर येथील जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णालयाचा दौरा करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सहजिल्हाधिकारी निशांत कुमार यांनी या घटनेची माहिती देऊन रुग्णालयात ऑक्‍सिजन कमी पडल्याची बाब ही एक अफवा असल्याचे सांगितले. या सर्व रुग्णांचा मृत्यू त्यांना झालेला कोरोना संसर्ग गंभीर स्थितीत पोहोचल्यामुळे झाला असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या पथकाने ऑक्सिजन प्रकल्पाची तपासणी केली आहे, तसेच प्रत्येक वॉर्डचा दौरा करून प्रत्येक पॉइंट आणि व्हॉल्व तपासला आहे. येथे कुठेही काहीही अडचण नाही, ऑक्सिजन प्रकल्पाचा दाब योग्य आहे आणि पुरवठ्यात कोणतीही अडचण आलेली नाही. हे वाचा - या देशाच्या PM निवासात वावरतंय भूत? रक्तरंजित इतिहासानंतर 9 वर्षात फार काळ राहिले नाहीत एकही पंतप्रधान सरकारी रुग्णालयात ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्याचा ऑक्सिजनच्या कमतरतेशी काहीही संबंध नाही. जितक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्या सर्वांचे वय जास्त होते आणि त्यांना आधीपासूनच गंभीर स्वरुपाचे आजार होते. आम्ही वैयक्तिकरित्या तपासणी केली आहे. त्यामुळे हे मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेले नाहीत, असे आम्ही सांगू शकतो. मात्र, मृत्यूंची संख्या जास्त आहे, ही बाब नक्कीच दुःखद आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी बहुतेकांना मधुमेह, हृदयविकार आणि कार्डियाक अरेस्ट अशा गंभीर स्वरूपाचे आजार होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं हे वाचा - ‘सीरम’ प्रमुख अदर पुनावाला म्हणतात ‘मी पुन्हा येईन’; धमकी देणाऱ्यांना सूचक इशारा? दरम्यान, देशात कोरोनानं रौद्र रुप धारण केलं आहे. मागील दहा दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद (Coronavirus in India Latest Update) होत आहे. शुक्रवारी हा आकडा चार लाखाच्या पार गेला होता. मात्र, आता काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील चोवीस तासात 3 लाख 8 हजार 522 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. पहिल्यांदाच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण (Corona Patient) बरे झाले आहेत. तर, रुग्णसंख्येतही शुक्रवारच्या तुलनेत घट झाली आहे. या चोवीस तासांमध्ये 3,684 जणांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Andhra pradesh, Corona updates, Coronavirus

    पुढील बातम्या