मराठी बातम्या /बातम्या /देश /UPSCची तयारी करणारे घेतात या १३ वर्षाच्या गुरूचं मार्गदर्शन!!

UPSCची तयारी करणारे घेतात या १३ वर्षाच्या गुरूचं मार्गदर्शन!!

UPSCची तयारी कराणारे सद्या  १३ वर्षाच्या अमरकडून अभ्यासक्रमाचे धडे घेत आहेत. अमरच्या युट्यूब चॅनलला सद्या लाखो सब्सक्रायबर देखील आहेत.

UPSCची तयारी कराणारे सद्या १३ वर्षाच्या अमरकडून अभ्यासक्रमाचे धडे घेत आहेत. अमरच्या युट्यूब चॅनलला सद्या लाखो सब्सक्रायबर देखील आहेत.

UPSCची तयारी कराणारे सद्या १३ वर्षाच्या अमरकडून अभ्यासक्रमाचे धडे घेत आहेत. अमरच्या युट्यूब चॅनलला सद्या लाखो सब्सक्रायबर देखील आहेत.

    नवी दिल्ली, ३ फेब्रुवारी : गुगलच्या वेगानं उत्तर देणारे किंवा खूपच कमी वयात असामान्य बुद्धीमता लाभलेले अनेक जण आपण पाहिले आहेत. सोशल मीडियावर अशा प्रकारचे सारे व्हिडीओ किंवा त्यासंदर्भातील बातम्या पाहिल्यानंतर 'क्या कमाल का दिमाग पाया है!' किंवा 'हा तर आईनस्टाईन आहे' अशा शब्दात अनेक जण दाद देखील देतात. अशाच प्रकारच्या व्हिडीओला आता युट्युबवर लाखोंच्या लाईक्स मिळत आहेत.

    तेरा वर्षाच्या हा टॅलेन्टेड मुलगा चक्क युपीएससीचा अभ्यास शिकवत आहे. अमर स्वस्तिक असं या टॅलेन्टेड मुलाचं नाव असून अमरच्या युट्यूब चॅनलला 1.87 लाख सब्सक्रायबर आहेत. २०१६ साली अमरनं स्वत:चं 'लर्न विथ अमर' नावानं युट्यूब चॅनल सुरू केलं. अल्पावधीतच हे युट्यूब चॅनल अनेकांच्या पसंतीला उतरलं. अमरनं देखील आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलं आहे. अमरला आयएस अधिकारी होऊन भ्रष्टाचराविरोधात लढायचं आहे.

    भूगोल आणि राज्यशास्त्र हे अमरच्या आवडीचे विषय आहेत. इंडियन एक्सप्रेसनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. आयएएसचं शिक्षण देणाऱ्या अमरचा जन्म तेलंगणामध्ये झाला आहे. अमरचे वडील शिक्षक आहेत. अमरला अभ्यासामध्ये असलेली गती आणि आवड पाहून त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. एके दिवशी अमरचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर त्याच्या आईनं अपलोड केला. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. त्यानंतर युट्यूब चॅनल सुरू करण्याचा निर्णय अमरनं घेतला. सध्या हे युटयुब चॅनल अनेकांच्या पसंतीला देखील उतरलं आहे.

    <iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/Kao_sv65g-8" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>

    १३ वर्षाचा अमर युपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी गुरू ठरला आहे. विविध विषयांवर व्हिडीओ बनवून अमर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करत आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती देखील मिळत आहे.

    इतक नव्हे तर अमरचे व्हिडिओ पाहिल्यानंतर युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी त्याला शंका विचारतात आणि त्यावर अमर उत्तरे देखील देतो. युपीएससी करण्यासाठी अनेक जण हजारो रुपयांची फी भरून क्लास लावतात. पण अमरच्या या ऑनलाईन शिकवणीमुळे विद्यार्थ्यांना सोप्या आणि सहज पद्धतीने कठीण विषय समजून घेता येतोय.

    VIDEO: ...जेव्हा मोदींच्याच स्टाईलमध्ये बोलत राहुल गांधी म्हणतात, 'चौकीदार चोर है'

    <iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-337920" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzM3OTIw/"></iframe>

     

    First published:

    Tags: Upsc, Upsc exam, UPSC SYLLABUS