S M L

अंधश्रद्धेच्या नावाखाली १२० महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला अटक

Updated On: Jul 21, 2018 06:20 PM IST

अंधश्रद्धेच्या नावाखाली १२० महिलांवर बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला अटक

हिसार, २१ जुलैः हरियाणातील फतेहबाद जिल्ह्यातील टोहानामध्ये बाबा बालकनाथ मंदिरचे पुजारी अमरपुरी उर्फ बिल्लूचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बिल्लू महिलांसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. या प्रकरणी ६० वर्षांच्या भोंदूबाबाला पोलिसांनी १२० महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. बिल्लू अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांना फसवायचा. तंत्रविद्येदरम्यान महिलांना गुंगीचे औषध द्यायचा. हे औषध घेऊन महिला बेशुद्ध व्हायच्या. यानंतर महिलांवर बलात्कार करुन त्यांची व्हिडिओ क्लिप तयार करायचा. ही क्लिपनंतर महिलांना दाखवून बिल्लू त्यांना ब्लॅकमेलही करायचा. बिल्लूच्या एका नातेवाईकानेच पोलिसांना यासंबंधी माहिती दिली.

Loading...
Loading...

त्याने आतापर्यंत १२० महिलांवर बलात्कार केल्याचेही नातेवाईकानेच उघड केले. यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता त्यांना व्हिडिओ क्लिप मिळाल्या. पोलिसांनी अमरपुरीला अटक केली असून त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. या भोंदूबाबावर बलात्कार, विनयभंगासारखे इतर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. आयटी अॅक्टच्या कलमांनुसारही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः

पुन्हा एकदा गो- तस्करीच्या संशयातून मुस्लिम तरुणाचा बळी

मुख्यमंत्र्याच्या महापूजेला मराठा,धनगर समाजाचा विरोध कायम

अमूलनेही घेतली राहुल- मोदींच्या भेटीची दखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2018 04:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close