Home /News /national /

12 वर्षीय मुलाचं स्वप्न पूर्ण; एका दिवसासाठी झाला पोलीस अधिकारी, कारण वाचून पाणावतील डोळे

12 वर्षीय मुलाचं स्वप्न पूर्ण; एका दिवसासाठी झाला पोलीस अधिकारी, कारण वाचून पाणावतील डोळे

एका दिवसासाठी का होईना पण हर्षला पोलीस अधिकारी होता आलं. त्याला एका दिवसासाठी प्रयागराजचा अतिरिक्त महासंचालक (Additional DG) करण्यात आलं

लखनऊ 04 जुलै : मोठेपणी पोलीस होण्याचं स्वप्नं अनेकजण लहानपणापासून बघत असतात. काहीजण हे स्वप्न पूर्णही करतात. प्रयागराजमधल्या (Prayagraj) 12 वर्षांच्या हर्ष दुबेचंही पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. पण त्याला वेदनेची किनार आहे. हर्ष कॅन्सर पेशंट आहे. पोलीस अधिकारी व्हावं हे त्याचं स्वप्नं होतं. पण त्याच्या आजारामुळे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता धूसर होती. मात्र एका दिवसासाठी का होईना पण हर्षला पोलीस अधिकारी होता आलं. त्याला एका दिवसासाठी प्रयागराजचा अतिरिक्त महासंचालक (Additional DG) करण्यात आलं. टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर याबद्द्लचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज झोनचे ADG प्रेम प्रकाश यांनी कॅन्सर पेशंट हर्षचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ दिली. त्यांनीच त्याला एका दिवसासाठी ADG चं काम सांभाळायला मदत केली. एका दिवसासाठी Additional DG झालेला हर्ष (Cancer Patient becomes ADG For One Day) पोलिसांच्या कामकाजाबद्दल उत्सुकतेने माहिती विचारत तर होताच; पण त्यानं काही कागदपत्रंही हाताळली. विशेष म्हणजे त्याला त्यावेळेस ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी सॅल्युटही केला. वय वर्ष फक्त 5; मात्र, तिने केला हा कारनामा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद “शहरातील कॅन्सर पेशंट्सना मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून मला या 12 वर्षांच्या मुलाबद्दल आणि त्याच्या आजाराबद्दल समजलं. या लहानग्य हिंमत मिळावी, त्याचं मनोधैर्य वाढावं यासाठी मी हा निर्णय घेण्याचं ठरवलं, ” असं ADG प्रेम प्रकाश यांनी सांगितलं. अगदी लहान वयात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढणाऱ्या हर्षचं मनोबल यामुळे बरंच वाढलं आहे. त्याला आजाराशी लढण्यासाठी मानसिक हिंमत मिळाली आहे. ADG प्रेम प्रकाश (ADG Prem Prakash) यांनी त्याला पोलिसांचा ड्रेसही भेट दिला. हर्षचे वडील संजय दुबे ई-रिक्षा ड्रायव्हर आहेत. जीवघेण्या आजाराशी लढणाऱ्या आपल्या मुलाला ADG च्या खुर्चीवर बसलेलं जेव्हा त्यांनी पाहिलं, तेव्हा हर्षच्या वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. त्यांना शब्दांतून आनंद व्यक्त करता येत नव्हता. हर्षला ही संधी देणारे पोलीस अधिकारी, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते पंकज रिझवान यांचे हर्षच्या वडिलांनी मनापासून आभार मानले. आपल्या मुलाला लवकरातलवकर या आजारावर मात करता यावी यासाठी हे सगळेजण सतत झटत आहेत आणि त्याच्या मनात सतत सकारात्मक उर्जा निर्माण करत आहेत असं त्यांनी सांगितलं. हर्षवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत करण्याचं आश्वासन या डॉक्टरांच्या टीमनं दिलं आहे. CBSE नं लाँच केलं नवीन 'परीक्षा संगम' पोर्टल; इथेच बघता येणार यंदाचा निकाल; असं असेल स्वरूप ADG म्हणून ज्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात ती सर्व कामं हर्षनं एका दिवसासाठी केली. कमला नेहरू हॉस्पिटलमधील सीनिअर ऑन्कॉलॉजिस्ट आणि पद्मश्री पुरस्कार विजेचे डॉ. बी. पारूल (Dr. B. Parul) हर्षवर उपचार करत आहेत. “सहनशक्ती अणि धैर्य या दोन गोष्टी कॅन्सरच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक आहेत. जर वेळेवर, योग्यप्रकारे आणि योग्य उपचार मिळाले तर कॅन्सर नक्की बरा होतो.,” असं डॉ. बी. पारुल यांनी सांगितलं. हर्ष मोठ्या हिंमतीने आपल्या आजाराशी लढतो आहे. त्याचा हा लढा यशस्वी होवो आणि पोलीस अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्नं अगदी कायमसाठी खरं होवो याच शुभेच्छा.
First published:

Tags: Cancer, Police

पुढील बातम्या