भुकेनं व्याकूळ झालेल्या भावा-बहिणीसाठी मुलीने मंदिरात केली चोरी

भुकेनं व्याकूळ झालेल्या भावा-बहिणीसाठी मुलीने मंदिरात केली चोरी

या मुलीने मंदिराच्या दानपेटीतून 250 रुपये चोरले होते. तिला तिचं आणि भाऊ-बहिणीचं पोट भरायचं होतं. तिचा छोटा भाऊ आणि बहीण भुकेले होते. त्यांच्या घरात काहीच शिल्लक नव्हतं. खाण्यासाठी काही नव्हतं आणि पैसेही नव्हते.

  • Share this:

भोपाळ (मध्य प्रदेश) 1 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. 12 वर्षांच्या मुलीने भुकेनं तडफडणाऱ्या आपल्या भावबहिणीसाठी मंदिरात जाऊन चोरी केली. या मुलीची चोरी पकडली गेली आणि तिला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं.

या मुलीने मंदिराच्या दानपेटीतून 250 रुपये चोरले होते. तिला तिचं आणि भाऊ-बहिणीचं पोट भरायचं होतं. तिचा छोटा भाऊ आणि बहीण भुकेले होते. त्यांच्या घरात काहीच शिल्लक नव्हतं. खाण्यासाठी काही नव्हतं आणि पैसेही नव्हते.

CCTV मध्ये पकडली चोरी

भुकेनं व्याकूळ झालेली ही मुलगी मंदिरात शिरली तेव्हा तिला तिथे लावलेल्या CCTV बदद्ल काहीच माहीत नव्हतं. या कॅमेऱ्यात ती चोरी करताना पकडली गेली.

या 12 वर्षांच्या मुलीची आई 3 वर्षांपूर्वीच वारली. तिचे वडील मजुरी करतात. यातूनच ते कुटुंबाचं पोट भरत होते. ही मुलगी त्यांना मदत करत होती. याच धकाधकीमध्ये ती शाळेतही जायची. पोलीस जेव्हा या मुलीला पकडण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा तिने या चोरीची कबुली दिली. दानपेटीतून चोरलेल्या पैशातून ती पीठ दळून आणायला गेली होती. उरलेले 70 रुपये तिने स्कूल बॅगमध्ये ठेवले होते.

(हेही वाचा : ट्रेन लेट झाली तर आता सरकार देणार भरपाई)

=====================================================================================

VIDEO : उदयनराजेंविरोधात लढण्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी अखेर केला खुलासा

Published by: Arti Kulkarni
First published: October 1, 2019, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading