12 क्रू मेंबर्ससाठी देवदूत ठरलं भारतीय तटरक्षक दल, समुद्राच्या मधोमध खराब झालं होतं जहाज

गुजरात नजीकच्या (Gujarat) समुद्रात इंधन प्रदुषणामुळे (Fuel Pollution) अडकलेल्या एका जहाजाला मदतीची गरज होती. याबाबत माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाचे एमव्ही हरमीज जहाज हे अडकून पडलेल्या एमव्ही कांचन जहाजावरील क्रु मेंबर्सच्या (Crew Members) मदतीला धावून गेलं.

गुजरात नजीकच्या (Gujarat) समुद्रात इंधन प्रदुषणामुळे (Fuel Pollution) अडकलेल्या एका जहाजाला मदतीची गरज होती. याबाबत माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाचे एमव्ही हरमीज जहाज हे अडकून पडलेल्या एमव्ही कांचन जहाजावरील क्रु मेंबर्सच्या (Crew Members) मदतीला धावून गेलं.

  • Share this:
मुंबई, 22 जुलै: सागरी प्रवासादरम्यान जहाजाला अपघात होणं, नैसर्गिक किंवा तांत्रिक कारणांमुळे दुर्घटना घडणं हे आपण अनेक वेळा पाहतो. अशा वेळी दुर्घटनाग्रस्तांना तातडीने मदत देऊन त्यांची सुखरुप सुटका करणं अत्यंत महत्वाचं असतं. वेळेवर संबंधित यंत्रणेशी संपर्क झाला तर ही मदत तातडीने मिळू शकते. सागरी प्रवासादरम्यान प्रतिकूल हवामानामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे संकटात सापडलेल्या जहाजे, क्रु मेंबर्स तसेच जहाजावरील प्रवाश्यांना मदतीचा हात देऊन, त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guards) नेहमीच सज्ज असते. याचा प्रत्यय नुकताच पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गुजरात नजीकच्या (Gujarat) समुद्रात इंधन प्रदुषणामुळे (Fuel Pollution) अडकलेल्या एका जहाजाला मदतीची गरज होती. याबाबत माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाचे एमव्ही हरमीज जहाज हे अडकून पडलेल्या एमव्ही कांचन जहाजावरील क्रु मेंबर्सच्या (Crew Members) मदतीला धावून गेलं. विशेष म्हणजे अत्यंत प्रतिकूल हवामान असतानाही रात्रीच्या वेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत एमव्ही हरमीजने (MV Harmeez) एमव्ही कांचन (MV Kanchan) या जहाजावरील सर्व 12 क्रू मेंबर्सची सुखरुप सुटका केली. हे वाचा-लडाखनंतर आता उत्तराखंडमध्ये LAC जवळ चीनच्या हालचाली वाढल्या; भारतही सज्ज भारतीय तटरक्षक दलाच्या एमव्ही हरमीजने बुधवारी इंधन प्रदूषणामुळे गुजरातमधील उमरगाममध्ये अडकलेल्या एमव्ही कांचन या जहाजावरील 12 क्रु मेंबर्सची सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, एमव्ही कांचन, 12 भारतीय क्रु मेंबर्ससह गुजरातमधील उमरगाममध्ये अडकल्याबाबत मुंबईतील भारतीय तटरक्षक दलाच्या द मेरिटाईम रेस्क्यु अँड कोऑर्डिनेशन सेंटरला (MRCC) 21 जुलैला दुपारी DGCOMM केंद्राकडून याबाबत सूचना मिळाली होती. इंधन प्रदुषणामुळे जहाज सुरू होऊ शकत नव्हते. जहाजामध्ये वीजेची सुविधा देखील नव्हती. 50 नॉटिकल माइल्स वेगाने वारे वाहत असल्याने आणि समुद्रात 3 ते 3.5 मीटर उंचीच्या लाटा उसळत असल्याने या भागातील हवामान खराब होते. हे वाचा-भारतावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट, या 13 राज्यात वाढतोय धोका 12 लोकांना सुखरुप बाहेर काढले एमआरसीसी मुंबईने एमव्ही कांचन जहाजला मदत मिळावी यासाठी त्या भागातील अन्य जहाजांकरिता तातडीने इंटरनॅशनल सेफ्टी नेट (ISN) अॅक्टिव्हेट केलं. या आयएसएनला तातडीने एमव्ही हरमीजने प्रतिसाद दिला आणि हे जहाज संकटग्रस्त जहाजाच्या दिशेने रवाना झालं असल्याचं सांगितलं. खराब हवामान असतानाही एम व्ही हरमीजने रात्रीच्या वेळी एम व्ही कांचन जहाजातील सर्व 12 क्रु मेंबर्सला सुखरूप बाहेर काढलं. याशिवाय अडकलेल्या जहाजाच्या मदतीकरिता ईटीव्ही वॉटर लिली ही यंत्रणा डीजीशिपिंगने तैनात केली तसंच जहाजाच्या मालकांनी दोन टगबोटही तैनात केल्या असून त्या गुरुवारी दुपारपर्यंत सुरक्षितपणे समुद्र किनाऱ्याला पोहोचणं अपेक्षित होतं
First published: