प्रजासत्ताक दिन संचलनात 48 वर्षांत महाराष्ट्राच्या चित्ररथाला 12 पुरस्कार

प्रजासत्ताक दिन संचलनात 48 वर्षांत महाराष्ट्राच्या चित्ररथाला 12 पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच आकर्षक ठरला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या (independence day 2021) राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच आकर्षक ठरला आहे. 1971 ते 2019 या 48 वर्षाच्या काळात महाराष्ट्राने 36 वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचे दर्शन घडविले आहे आणि 12 वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठीचा पुरस्कारही पटकाविला आहे. यंदा ‘ वारकरी संत परंपरेवर ’  आधारित चित्ररथ सादर होत आहे.

महाराष्ट्राने 1971 मध्ये ‘वारली दिंडी’ या विषयावर चित्ररथ सादर केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी 1973 साली ‘ भारत छोडो आंदोलन ’ ही संकल्पना घेऊन या आंदोलनातील महत्वाच्या प्रसंगांचे चित्ररूप राजपथावर सादर केले होते. राज्य निर्मितीपासून अवघ्या 14 वर्षात राज्यांमध्ये विविध मोठे उद्योगधंदे स्थापीत झाले 1974 च्या चित्ररथामध्ये याच उदयोगधंदयाचे प्रतिबिंब राजपथावर दिसले. पुढे 1978 मध्ये ‘विविधतेत समानता’ असा चित्ररथ राजपथावर झळकला. तर वर्ष 1979 मध्ये ‘बाल विकास ’ या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून बालविकासाचे धोरण दर्शविले.

महाराष्ट्रामधील भौगोलिक भागानुरूप विविध सण साजरे केले जातात, असाच विषय धरून 1980 ‘ महाराष्ट्रातील सण ’ असा  चित्ररथ साकारण्यात आला.  वर्ष  1981 आणि अलीकडे 2018 मध्ये ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक’ अशा ऐतिहासिक विषयावर चित्ररथ राजपथावर झळकला.  दोन्ही वेळी या संकल्पनेच्या चित्ररथाला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले हे विशेष. 1982मध्ये राज्यातील समृद्ध  ‘लोककला’ विषयावरील चित्ररथाने राजपथावरील प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यात साजरा होणारा  ‘बैलपोळा’ हा सण विशेष आहे. याच सणावर वर्ष 1983 मध्ये आधारीत चित्ररथ दर्शविण्यात आला.

लोकमान्य टिळकांवर आधारित विविध विषयांवर 4 वेळा  चित्ररथ

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे भारतीय स्वातंत्र चळवळीत विशेष महत्व आहे. लोकमान्य टिळकांवर आधारीत चित्ररथ राजपथावर वेगवेगळया विषयाला धरून उभारण्यात आले. प्रथम सन 1984 आणि नंतर सन 2017  मध्ये लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना  ‘स्वराज माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ’ या घोषणेवर आधारीत  चित्ररथ उभारण्यात आला. या चित्ररथाला दोनही वेळा व्दितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष 1988 मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ तर वर्ष 1993 मध्ये ‘लोकमान्य  टिळाकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ विषयावर चित्ररथ  होता. यापैकी  1993 च्या चित्ररथाने प्रथम पुरस्कार पटकाविला.

आंब्यांचा राजा ‘हापूस आंबा’ या संकल्पनेवर 1994 मध्ये चित्ररथ साकारण्यात आला. महाराष्ट्राचा स्थापत्य ठेवा असलेल्या अंजठा लेणी यावर आधारित 2004 ला ‘अजंटा लेणींमधील काही लेणींची  भीतीचित्रे  चित्ररथात दर्शविण्यात आली. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या  ‘ ग्रामस्वच्छता अभियान’ योजनेवर आधारीत चित्ररथ 2006 मध्ये साकारण्यात आला.  राज्याचीमध्ये भरणारी महत्वाची धार्मिक जत्रा ‘जेजुरीचा खंडेराया ’ या संकल्पनेचा चित्ररथ वर्ष 2007 मध्ये चित्ररथ दर्शविण्यात आला. पुढे 2009 ला ‘ धनगर ’ असा विषय घेऊन चित्ररथ उभारण्यात आला. वर्ष 2010 ला जगाचे लक्ष वेधणारा ‘ मुंबईचा डबेवाला ’ या संकल्पनेवरील चित्ररथ साकारण्यात आला.

‘पंढरीची वारी’

महाराष्ट्राचे नृत्य ‘लावणी ’ यावर चित्ररथ 2011 मध्ये दर्शविण्यात आला, या चित्ररथाला  प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. वर्ष 2012 मध्ये वेरूळ लेणीमधील ‘कैलास मंदीर’ या विषयावरील चित्ररथ उभारण्यात आला होता. सण 2014 मध्ये कोकाणातील मच्छीमारी समुहातील असणारा महत्वपूर्ण  सण ‘ नारळी पोर्णिमा’ या विषयावर चित्ररथ साकाराण्यात आला. वर्ष 2015 मध्ये राज्याची शतकांची परंपरा  ‘पंढरीची वारी’ या वारीच्या विषयावर आधारित चित्ररथाने राजपथावर भक्तीमय वातावरण निर्माण केले. सण 2019 महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त  ‘भारत छोडो ’ आंदोलनवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला.

आतापर्यंत महाराष्ट्राच्या 12 चित्ररथांना विविध पुरस्कार

महाराष्ट्राला लाभलेल्या वैविध्यपुर्ण सांस्कृत‍िक-सामाजिक, पर्यटन आदि विषयांवर चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली आहे. यात राज्याने 12 वेळा पुरस्कार पटकावले आहे. वर्ष 1993 ते 1995 पर्यंत सलग तीन वेळा प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम निर्माण केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला 7 वेळा प्रथम पुरस्कार मिळालेले आहेत. तीन वेळा द्वितीय पुरस्कार व दोन वेळा तृतीय पुरस्कार मिळाला आहे. वर्ष 1981  आणि 2018 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेका’वर आधारित चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता.

Published by: sachin Salve
First published: January 24, 2021, 7:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या