Home /News /national /

Insta वरील मित्रानं भेटायला बोलावून केला विश्वासघात, अकरावीतील मुलीसोबत घडला भयंकर प्रकार

Insta वरील मित्रानं भेटायला बोलावून केला विश्वासघात, अकरावीतील मुलीसोबत घडला भयंकर प्रकार

Rape on Minor Girl: इन्स्टाग्रामवर अनोळखी तरुणासोबत मैत्री करणं एका अकरावीतील मुलीला चांगलंच महागात पडलं आहे. आरोपीनं पीडित मुलीला भेटायला बोलावून धक्कादायक कृत्य केलं आहे.

    भोपाळ, 31 जानेवारी: इन्स्टाग्रामवर अनोळखी तरुणासोबत मैत्री (Friendship on instagram) करणं एका अकरावीतील मुलीला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित तरुणाने इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून पीडित मुलीला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं होतं. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं पीडित मुलीला शीतपेयातून गुंगीचं औषध देऊन तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठला आहे. त्याने बेशुद्धावस्थेत असणाऱ्या पीडितेवर लैंगिक अत्याचार (Minor girl rape) केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीनं थेट पोलीस ठाणं गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमासह गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) इंदौर शहरातील भंवरकुआं पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तर पीडित मुलगी इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. काही दिवसांपूर्वी तिची विनायक गिडवानी नावाच्या 22 वर्षीय तरुणाशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. यानंतर आरोपीनं पीडितेचा विश्वास संपादन केला. हेही वाचा-हिंगोलीत गर्भवती महिलेसोबत डॉक्टरचं घृणास्पद कृत्य; तपासणीसाठी घेऊन गेला अन्... दरम्यान, चांगली मैत्री झाल्यानंतर आरोपी गिडवानी यानं पीडितेला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं. पीडित मुलगीही इन्स्टाग्रामवरील मित्रावर विश्वास ठेवून त्याला भेटायला गेली. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं गुंगीचं औषध टाकलेलं शीतपेय पीडित मुलीला प्यायला दिलं. शीतपेय प्यायल्यानंतर पीडित मुलीला गुंगी आली. याचा फायदा घेत नराधम आरोपीनं विकृतीचा कळस गाठत पीडित मुलीवर बेशुद्धावस्थेतच बलात्कार केला. हेही वाचा-बेरोजगार तरुणानं मुलगी बनून Instaवर सुरू केला भलताच धंदा, कांड वाचून हादराल पीडित मुलीला शुद्ध आल्यानंतर, तिच्यासोबत घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला. यानंतर पीडित मुलीनं थेट भंवरकुआं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत, बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमासह गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Madhya pradesh, Rape on minor

    पुढील बातम्या