Home /News /national /

1100 वर्षांपूर्वीही रंगला होता निवडणुकीचा संग्राम, हे मंदिर देतंय 'लोकशाही'ची साक्ष

1100 वर्षांपूर्वीही रंगला होता निवडणुकीचा संग्राम, हे मंदिर देतंय 'लोकशाही'ची साक्ष

भारतातील लोकशाही अगदी अलीकडच्या काळातील आहे असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण भारतात अगदी प्राचीन काळापासून लोकशाही व्यवस्था होती, त्याबद्दल लोकांना माहितीही होती. तमिळनाडूची राजधानी चेन्नईपासून जवळपास 90 किलोमीटर अंतरावर असलेलं उथिरामेरुर हे ठिकाण अगदी पूर्वीपासूनच लोकशाहीचं जन्मस्थान मानलं जातं.

पुढे वाचा ...
चेन्नई, 04 फेब्रुवारी: भारतामध्ये अनेक पुरातन मंदिरं (Old Temples in India), वास्तू आहेत. त्यांना खूप मोठा इतिहास आहे. महत्त्वाचं म्हणजे ही फक्त देवस्थानं किंवा पर्यटनं स्थळं नाहीत तर त्यांना सामाजिक संदर्भही आहेत. त्या काळातील किंवा काळाच्या पुढे जाणाऱ्या अनेक गोष्टी या देवस्थानांच्या परंपरा, बांधकाम यावरुन समजतात. भारत जगातील सगळ्यांत मोठा लोकशाही देश (Biggest Democracy In The World) आहे. या लोकशाहीबद्दल महत्त्वाची माहिती तमिळनाडूची (Tamilnadu) राजधानी चेन्नईमधील (Chennai) उथिरामेरुर (Uthiramerur) या ठिकाणाच्या 1100 वर्षं जुन्या मंदिराच्या भिंतीवर त्या काळी कोरण्यात आली होती. हे सगळं बघून थक्क व्हायला होतं. भारतातील लोकशाही अगदी अलीकडच्या काळातील आहे असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण भारतात अगदी प्राचीन काळापासून लोकशाही व्यवस्था होती, त्याबद्दल लोकांना माहितीही होती. किंबहुना तमिळनाडूची राजधानी चेन्नईपासून जवळपास 90 किलोमीटर अंतरावर असलेलं उथिरामेरुर हे ठिकाण अगदी पूर्वीपासूनच लोकशाहीचं जन्मस्थान मानलं जातं. अर्थात अनेकांना याबद्दल माहिती नाही. उथिरामेरुर मंदिर मदुरंतकम शहरापासून जवळपास 25 किमी अंतरावर आहे. हे मंदिर 1100 वर्षं जुनं आहे. 30 वर्षांपूर्वी या मदुरंतकम शहरापासूनच तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुक पक्षाच्या प्रमुख जयललिता (Jaylalita) यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचा पहिला प्रचार सुरू केला होता. हे वाचा-इतिहास जाणून घ्या; चीन-पाकिस्तान जवळीकीवरुन भाजपचं राहुल गांधींना प्रत्युत्तर शेकडो वर्षांपूर्वी उथिरामेरुरच्या 30 वॉर्डांसाठी 30 लोकप्रतिनिधींची निवड मतदान प्रक्रियेद्वारे करण्यात आली होती अशी माहिती आहे. या मंदिरातील शिलालेखांवर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती कोरण्यात आली आहे. म्हणजे अगदी वॉर्ड्स कसे तयार करायचे, निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांची पात्रता,अपात्रतेचे निकष, निवडणूक प्रक्रिया,निवडून आलेल्या सदस्यांच्या समितींची स्थापना, या समितींचे कार्ये आणि चुकीचे काम करणाऱ्याला पदावरून हटवण्याचा अधिकार या सगळ्यांबद्दल या शिलालेखांमधून माहिती मिळते. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपलं काम चोख बजावत नसतील तर त्यांचं पद काढून घेण्याचा अधिकारही ग्रामस्थांना होता. पदावर असलेल्या एखाद्या व्यक्तीनं भ्रष्टाचार, लाच घेण्यासारखे गुन्हे केले तर त्याला संपूर्ण आयुष्यभर अपात्र ठरवण्यात येत असे. अगदी कौटुंबिक व्याभिचार किंवा वाईट कृत्य करणाऱ्यांना सात पिढ्यांपर्यंत निवडणुकीत सहभागी न होण्याची शिक्षा दिली जात असे. चेन्नईपासून जवळपास 90 किलोमीटर दूर अंतरावर कांचीपुरम जिल्ह्यामध्ये हे उथिरामेरुर आहे. पल्लव राजा नंदीवर्मन द्वितीयनं इ.स. 750 च्या आसपास याची स्थापना केली अशी माहिती आहे.त्याआधी इथं एक ब्राम्हण वस्ती होती असं म्हटलं जातं. या ठिकाणी पल्व, चोल,पांड्य, सांबुरवयार,विजयनगर राय आणि नायक यांचं राज्य होतं. राजेंद्र चोल आणि विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय या दोघांनी उथिरामेरुरला भेट दिली होती असं म्हटलं जातं. हे वाचा-पंजाबमध्ये Congressचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित? लवकरच होणार घोषणा या अतिशय पुरातन शिलालेखांवर निवडणूक, लोकशाही प्रक्रियेबद्दलची महत्त्वाची माहिती आहे. मातीचं एक भलंमोठं भांडं (कुदम) मतपेटी म्हणून गावाच्या किंवा शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी ठेवलं जात असे. मतदार त्यांच्या आवडीच्या उमेदवाराचं नाव ताडाच्या एका पानावर (पनई ओलाई) लिहून या कुदममध्ये टाकत असत. ही प्रक्रिया झाली की मतपेटी म्हणजे कुदममधून ही पानं काढून त्याची मोजणी केली जात असे. ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळत असत त्याला ग्रामसभेचं सदस्य म्हणून निवडलं जात असे. ही सगळी प्रक्रिया शिलालेखांवर कोरण्यात आली आहे. तमिळनाडूमधील प्रसिद्ध कांचीपुरमपासून 30 किमी अंतरावर असलेलं हे उथिरामेरुर जवळपास 1250 वर्ष जुनं आहे असं मानलं जातं. इथल्या ग्रामसभेच्या भिंती ग्रॅनाईट स्लॅबने बनविण्यात आल्या होत्या. त्यावर ही सगळी माहिती कोरण्यात आली होती. आपला देश त्या काळी सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या किती प्रगत होता याचा पुरावा देणारं हे एक उदाहरण आहे. अशाच प्रकारे आणखीही पुरातनं मंदिरं, इमारतींवर कोरण्यात आलेल्या चित्रं किंवा लेखांमधून त्या काळाची माहिती मिळते. अनेकदा तर आपले पूर्वज किती काळाच्या पुढचा विचार करत होते हेही समजतं. यासाठीच आपला हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याची, जीवापाड सांभाळण्याची गरज आहे.
First published:

Tags: Temple

पुढील बातम्या