मराठी बातम्या /बातम्या /देश /

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका; गुजरात सरकारने दिली माफी

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका; गुजरात सरकारने दिली माफी

2002 मध्ये दाहोद जिल्ह्यातील रंधिकपूर गावात बिलकिस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाला होता. तर, त्यांच्या कुटुंबातील सात लोकांची हत्या (Murder) करण्यात आली होती

    अहमदाबाद 16 ऑगस्ट : गुजरातमध्ये 2002 मध्ये गोध्रा दंगल झाली होती. 3 मार्च 2002 मध्ये दाहोद जिल्ह्यातील रंधिकपूर गावात बिलकिस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. तर, त्यांच्या कुटुंबातील सात लोकांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना 2004 मध्ये अटक करण्यात आली होती. आता या सामूहिक बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींची सुटका करण्यात आली आहे. Video कॉल रिसीव्ह करताच स्क्रीनवर न्यूड तरुणी...अन् नरक झालं 76 वर्षांच्या वृद्धाचं आयुष्य गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.. या निर्णयानंतर 11 दोषी गोध्रा तुरुंगातून बाहेर पडले. राधेश्याम शाही, जसवंत चतुरभाई नाई, केशुभाई वदानिया, बकाभाई वदानिया, राजीवभाई सोनी, रमेशभाई चौहान, शैलेशभाई भट्ट, बिपिन चंद्र जोशी, गोविंदभाई नाई, मितेश भट्ट आणि प्रदीप मोढिया अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या सर्वांवर सामूहिक बलात्कार आणि बिलकिस बानो यांच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याचा आरोप होता. पुढे मुंबई उच्च न्यायालयानेही विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि आरोपींना जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. स्वातंत्र्य दिनी औरंगाबादमध्ये संतापजनक घटना उजेडात, अल्पवयीन मुलीवर 6 जणांकडून अत्याचार दरम्यान, जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर या 11 दोषींनी 18 वर्षे तुरुंगवास भोगला. यानंतर एका कैद्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून त्यांना माफ करता येईल का, हे पाहण्याचे निर्देश गुजरात सरकारला दिले होते. या निर्देशानंतर गुजरात सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीने सर्व 11 आरोपींना माफी देण्याचा निर्णय एकमताने घेतला. समितीच्या या निर्णयाची माहिती राज्य सरकारला देण्यात आली. यानंतर या सर्वांना तुरुंगातून सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Gang Rape

    पुढील बातम्या