Elec-widget

'पश्चिम बंगालमध्ये 107 आमदार आमच्या संपर्कात', भाजपचा खळबळजनक दावा

'पश्चिम बंगालमध्ये 107 आमदार आमच्या संपर्कात', भाजपचा खळबळजनक दावा

कर्नाटकमध्ये राजकीय संकट अजून टळलेलं नाही. त्यातच दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही पळवापळवीचं राजकारण सुरू झालं आहे. सीपीएम, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचे मिळून 107 आमदार आमच्या संपर्कात आहेत,असं भाजप नेते मुकुल रॉय यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जुलै : कर्नाटकमध्ये राजकीय संकट अजून टळलेलं नाही. त्यातच दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही पळवापळवीचं राजकारण सुरू झालं आहे. सीपीएम, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचे मिळून 107 आमदार आमच्या संपर्कात आहेत,असं भाजप नेते मुकुल रॉय यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या आव्हानानंतर आता ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

मुकुल रॉय यांनी पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केलं. मुकुल रॉय हेही लोकसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत.

कर्नाटकी गोंधळाचा कोणाला फायदा? भाजपसुद्धा विश्वास ठरावाच्या आव्हानाला तयार

याआधी गोव्यामध्येही 10 काँग्रेस आमदारांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोनच दिवसांनी पश्चिम बंगालमधून ही बातमी आली आहे.

ममता बॅनर्जींनी दिला इशारा

Loading...

भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातला संघर्ष लोकसभा निवडणुकीत शिगेला पोहोचला. मागच्या महिन्यात तृणमूलच्या काही नेत्यांनी भाजपची वाट धरली. त्यावर ममतांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला होता.

काही नेत्यांना अशी आशा आहे की भाजपमध्ये गेलो तर आपली पापं धुतली जातील. पण ते मोठ्या भ्रमात आहेत. असं काहीही होणार नाही. जर कुणी गुन्हे केले असतील तर त्याचे परिणामही भोगावेच लागतील, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

मोदींचा प्रचारसभेत दावा

याआधी, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूलचे 40 आमदार आमच्या संपर्कात आहेत,असा दावा केला होता. आता भाजपचा हा दावा प्रत्यक्षात उतरताना दिसतो आहे.

तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मुकुल रॉय हे ममता बॅनर्जींना उजवा हात मानले जात. एवढ्या आमदारांना भाजपकडे वळवण्यात त्यांचा मोठा हात आहे, अशी चर्चा आहे.

================================================================================================

गुगल पोहोचलं तुमच्या बेडरूमपर्यंत, तुमची माहिती सुरक्षित तर आहे ना?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 07:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...