आता बदललं एक किलोचं माप, धान्य आणि भाजी घेताना काय होणार परिणाम?

आता बदललं एक किलोचं माप, धान्य आणि भाजी घेताना काय होणार परिणाम?

एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम असं परिमाण आता राहणार नाही. किलोच्या या बदललेल्या मापाला भारतानेही मान्यता दिली आहे.

  • Share this:

पॅरिस, 21 मे : आपण आतापर्यंत भाजी, फळं, धान्य हे सगळं किलोमध्ये मोजत होतो. पण इथून पुढे मात्र किलो हद्दपार होणार आहे. फ्रान्समध्ये जमलेल्या 60 वैज्ञानिकांनी मतदान करून हे परिमाण बदललं आहे. त्यामुळे किलोचं वजन तर बदललं आहे पण याचा आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही.

एक किलो साखर घेतली तर...

एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम असं परिमाण आता राहणार नाही. समजा, तुम्ही साखर घेताना एक किलो साखर घेतलीत तर साखरेचा एक दाणा कमी मिळाला किंवा थोडा जास्त आला तर काय फरक पडतो ? पण वैज्ञानिक प्रयोगांमध्ये मात्र एका कणानेही खूप फरक पडू शकतो.

भारताने दिली मान्यता

किलोग्रॅम, केल्विन, मोल आणि अॅम्पियर ही चार मापकं बदलण्याच्या या प्रस्तावाला भारतानेही मान्यता दिली आहे.

एक किलोचं हे परिमाण बदललं असलं तरी आपण भाजी किंवा धान्य खरेदी करताना किराणा दुकानदार किंवा भाजीवाला आपल्याला त्याच तराजूने धान्य तोलून देणार आहे. पण याच एक किलोच्या परिमाणाला आणखी अचूक करण्याचा हा प्रयत्न आहे.

हे नवं परिमाण जगभरामध्ये लागू करण्यात आलं आहे. याला 100 पेक्षा अधिक देशांनी मान्यता दिली आहे.

एक किलो म्हणजे किती ग्रॅम या मुद्द्याला 1989 मध्ये अनेक देशांनी संमती दिली होती. याला इंटरनॅशनल प्रोटोकॉल किलोग्रॅम असं म्हणतात. याच प्रोटोकॉलनुसार आता अचूक पद्धतीने वजन मोजलं जाणार आहे. एक किलो म्हणजे किती ग्रॅम या वजनाची ठराविक वर्षांनी पडताळणी घेतली जाते. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे.

========================================================================

अमित शहांच्या 'शाही डिनर'मध्ये तब्बल 35 वेगवेगळे पदार्थ, कोणते? पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 07:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading