नवी दिल्ली, 14 जून : कोरोना व्हायरस (Coronavirus)शी आज संपूर्ण जग लढत आहे. भारतामध्ये देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी अमेरिका भारताची मदत करणार आहे. अमेरिका जे व्हेंटिलेटर्स भारतासाठी पाठवणार आहे त्या पैकी 100 सोमवारी भारतात पोहोचणार आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. युनायटेड स्टेट्सकडून भारताला 200 व्हेंटिलेटर दान करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यापैकी 100 व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले आहेत. अमेरिकास्थित एका कंपनीकडून हे व्हेंटिलेटर्स बनवण्यात आले असून शिकागोमध्ये त्यांचे मॅन्यूफक्चरिंग करण्यात आले आहे.
एअर इंडियाच्या फ्लाइटने हे व्हेंटिलेटर्स भारतामध्ये दाखल होतील. भारतामध्ये कोरोनाशी लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार व्हेंटिलेटर्स भारतात दाखल झाल्यानंतर त्यांचा एक उद्घाटन सोहळा करण्यात येणार असून त्यानंतर त्यांचे वाटप कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्समध्ये करण्यात येणार आहे.
(हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात सोने कर्ज ठरेल सोयीचं, बँक आणि ग्राहकांना होणार फायदा)
16 मे रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून अशी माहिती दिली होती की, अमेरिकेकडून त्यांचा मित्र देश असणाऱ्या भारताला व्हेंटिलेटर्स दान करण्यात येणार आहेत. 'आपण एकत्र मिळून या शत्रूला हरवू' असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला होता.
I am proud to announce that the United States will donate ventilators to our friends in India. We stand with India and @narendramodi during this pandemic. We’re also cooperating on vaccine development. Together we will beat the invisible enemy!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 15, 2020
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले होते. या आठवड्यात सर्वाधिक कोरोनाबाधित असणाऱ्यांच्या यादीमध्ये इंग्लंडला मागे टाकत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर सर्वात वरच्या स्थानावर असणाऱ्या अमेरिकेमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आहेत. त्यानंतर अनुक्रमे ब्राझिल आणि रशियाचा क्रमांक लागतो.