अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला

अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर 100 जणांच्या समुहानं लाठ्या - काठ्यांनी हल्ला केला आहे.

  • Share this:

दिल्ली, 8 फेब्रुवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर 100 जणांच्या समुहानं लाठ्या - काठ्यांनी हल्ला केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

दिल्ली बाहेर असलेल्या 25 अनधिकृत झोपड्यांच्या कॉलनीचा आढावा घेण्यासाठी अरविंद केजरीवाल जात होते. यावेळी रस्त्यामध्ये जवळपास 100 जणांच्या टोळक्यानं केजरीवाल यांची कार रोखली. त्यानंतर त्यांनी हल्ला केला.

यासंदर्भातील एक व्हिडिओ 'आप'नं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी भाजपला दोष दिला आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप 'आप'नं केला आहे. दरम्यान, भाजपनं यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या हल्ल्यानंतर आता 'भाजप आणि आपमध्ये शाब्दिक हल्ला' रंगल्याचं पहायाला मिळत आहे.

VIDEO : अजित पवारांना पान खाऊ घालणाऱ्या टपरीवाल्याला अश्रू अनावर

First published: February 8, 2019, 6:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading