• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • धाडसाची कमाल! छोट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी 10 वर्षांची बहीण थेट रानडुकराशी भिडली

धाडसाची कमाल! छोट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी 10 वर्षांची बहीण थेट रानडुकराशी भिडली

एका रानडुक्कराने (Wild boar) दीड वर्षाच्या लहान मुलावर अचानक हल्ला (Attack) केला. रानडुक्कराच्या तावडीतून लहान भावाला सोडवण्यासाठी दहा वर्षांच्या बहिणीने आपल्या जीवाची बाजी लावली.

 • Share this:
  जोधपूर, 27 जानेवारी: आपल्या छोट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी एक बहीण मग ती वयाने कितीही लहान असली तरी काय करू शकते, याची प्रचिती नुकत्याच घडलेल्या घटनेतून आली आहे. एका रानडुक्कराने दीड वर्षाच्या लहान मुलावर अचानक हल्ला केला होता. यावेळी भावाचा आवाज ऐकून धावत आलेल्या दहा वर्षांच्या बहिणीने आपल्या भावासाठी जीवाची बाजी लावली. तिने कसलाही विचार न करता भावाला वाचवण्यासाठी  रानडुक्कराशी भिडली आहे. या हल्ल्यात दोघं चिमुकले बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना जोधपूर जवळील ओसियां तालुक्यातील पडासला या गावातील आहे. बुधवारी सकाळी भंवरू आणि त्यांची पत्नी संतोष शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांचा दीड वर्षांचा मुलगा शेतात खेळत होता. त्याचवेळी एका रानडुक्कराने या मुलावर अचानक हल्ला केला. त्यानंतर या चिमुकल्याच्या आवाजाने त्याची दहा वर्षाची बहिण संगिता धावत त्याच्याकडे आली. यावेळी ती पहिल्यांदा घाबरली, पण त्यानंतर तिने सर्व हिम्मत एकवटून भावाला वाचवण्यासाठी रानडुक्कराशी भिडली. सुरुवातीला या रानडुक्कराने या भावंडाना घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण दहा वर्षाच्या संगिताने आपल्या भावाभोवती संरक्षण कवच निर्माण केल्यासारख उभी राहिली. त्यानंतर रानडुक्कराने दोघांवर हल्ला केला. या झटापटीत या चिमुल्यांच्या ओरड्याच्या आवाजाने काही नातेवाईक धावत आले. त्यानंतर या रानडुक्कराने तेथून पळ काढला. या हल्ल्यात बहिण भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांना प्रथमोपचार केल्यानंतर जोधपूर येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याठिकाणी दोघांवर उपचार सुरू आहे. या हल्ल्यात रानडुक्कराने दोघांच्या अंगाला अनेक ठिकाणी चावा घेतला आहे. या दुर्दैवी हल्ल्यानंतर गावकऱ्यांनी रानडुकराच्या पाऊल खुणांच्या आधारे त्याचा शोध घेतला आहे. त्यावेळी गावकऱ्यांनी हल्लेखोर रानडुक्कर त्यांना एका झाडीत लपून बसलेलं पाहिलं. त्यानंतर त्यांनी काट्या आणि दगडाच्या मदतीने रानडुक्कराला ठार मारलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: